सिडको : सर्दी, खोकला, तापसह इतर आजाराचे दरररोज पाचशेहून अधिक रुग्ण ज्या रुग्णालयात तपासणीसाठी जातात त्या सिडको मोरवाडीतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभागच नसून सोनोग्राफी मशीनदेखील नसल्याने सर्वसामान्य रुग्णांना यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी याठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच महापौरांनीदेखील पाहणी केली असता यातही सोनाग्राफी मशीनची सुविधा तातडीने सुरू करण्यात यावी, असे सांगण्यात आले होते. परंतु अद्यापही याची सुविधा करण्यात आलेली नसल्याने महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभाराबाबात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी सिडकोतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांनी अचानक भेट दिली होती. यावेळी हा प्रकार उघडकीस आला होता.प्रसूतीची सुविधा असलेल्या यारुग्णालयात सोनोग्राफी मशीनच नसल्याने उपचार घेण्यासाठी महिला रुग्णांना अडचणी येत असल्याची समस्या यावेळी दिसून आली. सिडकोसारख्या या कामगार वसाहतीतील रु ग्णालयात प्रसूतिगृह असतानाही सोनोग्राफीचे मशीन नसल्याने सेना पदाधिकाºयांनी आश्चर्य व्यक्त केले.महिला रुग्णांना सोनोग्राफीसाठी बाहेर खासगीरु ग्णालयात पाठवित असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शिवसेना पदाधिकारी व नगरस्ोवकांच्या अचानक पाहणीनंतर काही दिवसांपूर्वीच महापौर पाहणी दौºयादरम्यान महापौर रंजना भानसी व शिस्टमंडळानेदेखील रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच लवकरात लवकर सोनोग्राफी मशीनची सुविधा उपलब्ध करण्याबाबतही महापौरांनी संबंधित विभागाला आदेशित केले होते, परंतु अद्यापही ही सुिवधा सुरू करण्यात आलेली नसल्याने सिडकोवासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणीदुरुस्ती करण्याच्या कारणास्तव मनपाच्या जुने सिडको येथील दवाखाना बंद करून तो इतरत्र हलविण्यात आला आहे, परंतु यामुळे जुने सिडको व परिसरातील रुग्णांना याचा लाभ घेता येत नाही. येथील रुग्णांनी श्री स्वामी समर्थ रुग्णालयात जाणे हे लांब पडत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. जुने सिडको येथील दवाखान्यातही दररोज ६० ते ७० रुग्णांची तपासणी केली जात असल्याने याठिकाणच्या रहिवासीयांसाठी मनपा याच परिसरात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात आली आहे.
सोनोग्राफी मशीन नसल्याने सर्वसामान्य रुग्णांना भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:44 IST
सर्दी, खोकला, तापसह इतर आजाराचे दरररोज पाचशेहून अधिक रुग्ण ज्या रुग्णालयात तपासणीसाठी जातात त्या सिडको मोरवाडीतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभागच नसून सोनोग्राफी मशीनदेखील नसल्याने सर्वसामान्य रुग्णांना यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
सोनोग्राफी मशीन नसल्याने सर्वसामान्य रुग्णांना भुर्दंड
ठळक मुद्देसिडको परिसर : मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात दररोज पाचशे रुग्णांची तपासणी