निफाडच्या उपनगराध्यक्षपदी नूरजहाँ पठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:19 IST2018-04-22T00:19:27+5:302018-04-22T00:19:27+5:30
येथील उपनगराध्यक्षपदी बसपाच्या नूरजँहा पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष मंगल वाघ यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या जागेवर नूरजहाँ पठाण यांची निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी तहसीलदार विनोद भामरे यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम बघितले.

निफाडच्या उपनगराध्यक्षपदी नूरजहाँ पठाण
निफाड : येथील उपनगराध्यक्षपदी बसपाच्या नूरजँहा पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष मंगल वाघ यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या जागेवर नूरजहाँ पठाण यांची निवड करण्यात आली. या निवडीप्रसंगी तहसीलदार विनोद भामरे यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम बघितले. याप्रसंगी नगराध्यक्ष मुकुंद होळकर, मुख्याध्याधिकारी किशोर चव्हाण, नगरसेवक राजाभाऊ शेलार, अनिल कुंदे, किरण कापसे, जावेद शेख, आनंद बिवलकर, देवदत्त कापसे, एकनाथ तळवाडे, स्वाती गाजरे, सुनीता कुंदे, नयना निकाळे, चारूशिला कर्डिले, अलका पवार, लक्ष्मी पवार, शिरीन मनियार, दिलीप कापसे आदी नगरसेवक उपस्थित होते. पठाण यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी सुनील निकाळे, असिफ पठाण, शिवाजी ढेपले, संजय कुंदे, तन्वीर राजे, इरफान सय्यद उपस्थित होते. उपनगराध्यक्षपदासाठी नूरजहाँ पठाण यांनी सादर केलेल्या नाम निर्देशनपत्रावर सूचक म्हणून अलका पवार, तर अनुमोदक म्हणून राजाभाऊ शेलार यांच्या सह्या होत्या. नूरजहाँ पठाण यांचे एकच नामनिर्देशनपत्र सादर झाल्याने पीठासीन अधिकारी भामरे यांनी नूरजहाँ पठाण या उपनगराध्यक्षपदी निवडून आल्याचे जाहीर केले.