शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी चार महिन्यांपासून वेतनाविना
By Admin | Updated: May 14, 2014 00:03 IST2014-05-13T20:18:32+5:302014-05-14T00:03:49+5:30
येवला - येवला तालुक्यात शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी गेल्या १२ महिन्यांपासून, तर अंगणवाडी कर्मचारी चार महिन्यांपासून पगार व मानधनापासून वंचित असल्याने कर्मचार्यांची लग्नसराई थंड, तर गेलीच शिवाय खर्चाची मोठ्या प्रमाणावर चणचण भासू लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी चार महिन्यांपासून वेतनाविना
येवला - येवला तालुक्यात शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी गेल्या १२ महिन्यांपासून, तर अंगणवाडी कर्मचारी चार महिन्यांपासून पगार व मानधनापासून वंचित असल्याने कर्मचार्यांची लग्नसराई थंड, तर गेलीच शिवाय खर्चाची मोठ्या प्रमाणावर चणचण भासू लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.
मार्च एण्डमुळे पगार उशिरा होतात हा अनुभव शिक्षक-शिक्षकेतरांना आहे. परंतु तब्बल अडीच महिने झाले तरी पगार नसल्याने, अडचणींना सामोरे जावे लागत आहे, विशेष म्हणजे हौसिंग लोनसह इतर कर्जाचे हप्तेबाबत विशेष चिंता व्यक्त होत आहे. बँकांचे फोन शिक्षकवर्गाकडे थकीत हप्त्याबाबत खणखणू लागले आहे. अंगणवाडी कर्मचार्यांचेही गेल्या चार महिन्यांपासूनचे मानधन मिळाले नसल्याने त्यांचाही पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अंगणवाडी कर्मचारी मोठ्या बिकट परिस्थितीत सेवाभावीपद्धतीने काम करीत असतानाही तुटपुंजे मिळणारे मानधनही वेळेवर नाही. शासनाचे विविध खात्यांचे सर्वे, आहारवाटप, लसीकरण यांसह विविध कामे अंगणवाडी कर्मचारी करतात. मानधन नसल्याने थकबाकीमुळे अंगणवाडी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित मानधन देण्याचीही मागणी कर्मचार्यांना केली आहे.