शिक्षकेतर कर्मचा-यांचे सातव्या दिवशीही लेखणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:13 IST2020-09-30T22:55:27+5:302020-10-01T01:13:36+5:30

नाशिकरोड : येथील बिटको महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचा-यांचे सातव्या दिवशीही लेखणी बंद आंदोलन सुरुच होते.

Non-teaching staff also stopped writing on the seventh day | शिक्षकेतर कर्मचा-यांचे सातव्या दिवशीही लेखणी बंद

शिक्षकेतर कर्मचा-यांचे सातव्या दिवशीही लेखणी बंद

ठळक मुद्दे24 सप्टेंबरपासून लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे.

नाशिकरोड : येथील बिटको महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचा-यांचे सातव्या दिवशीही लेखणी बंद आंदोलन सुरुच होते.
अकृषी विद्यापीठे व त्यातंर्गत येर्णा­या अशासकीय महाविद्यालयातील शिक्षकेतर सेवकांना लागू असलेला आश्वासित प्रगती योजनेचा 12 व 24 वर्ष पदोन्नतीचा लाभ मिळावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, पेन्शन त्वरीत मिळावी आदी मागण्यांसाठी विद्यापीठ व महाविद्यालय कर्मचारी महासंघाने 24 सप्टेंबरपासून लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. शासनाशी वेळोवेळी चर्चाही झाली आहे. परंतु मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. शासनाने मागण्या पूर्ण कराव्यात अन्याथा पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. सातव्या दिवशी लेखणीबंद आंदोलनामध्ये अनिल माळोदे, मुकुंद वैद्य, महेंद्र राऊत, सचिन खैरनार, पंकज थेटे, राहुल निकम, राजेश लोखंडे आदी सहभागी झाले होते.
 

 

Web Title: Non-teaching staff also stopped writing on the seventh day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.