पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST2021-06-17T04:11:30+5:302021-06-17T04:11:30+5:30
नाशिक : पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून असहकार ...

पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन
नाशिक : पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे मंगळवारी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही शासकीय उपक्रमात सहभाग घेतला नाही. तसेच आढावा बैठकांवर देखील बहिष्कार टाकण्यात आला. येत्या २५ रोजी राज्यभरातील कर्मचारी आमदारांना निवेदने सादर करणार आहेत.
राज्य शासन व जिल्हा परिषद सेवेतील कार्यरत पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी तसेच गट ब या संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती तसेच पदोन्नती त्याचप्रमाणे रिक्तपदे त्वरित भरण्याबाबत अनेकदा शासनाबरोबरच चर्चा होऊनही त्यावर कोणताच ठोस निर्णय घेतला जात नसल्याने पशुचिकित्सा व्यवसायी संघटना यांच्यावतीने असहकार आंदेालन केले जात आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी संघटनेने अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी तसेच गट ब या संवर्गातील आस्थापना सेवा तसेच आर्थिक, व्यावसायिक विषयाचे अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र, याप्रकरणी केवळ वेळकाढूपणाची भूमिका घेतली जात असल्याने कर्मचाऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही, असा आरेाप करीत या प्रकरणी तत्काळ निर्णय व्हावा या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना निवेदन सादर करण्यात आले. सहायक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी (गट-अ) सेवाप्रवेश नियम सुधारणा करावी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या धर्तीवर संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवासभत्ता मंजूर करावा, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती या पदनामाचे रूपांतर तालुका पशुसंवर्धन अधिकारी गट-अ पंचायत समिती असे करू नये, तिसऱ्या कालबद्ध पदोनन्नतीच्या वेतन निश्चितीत सुधारणा करावी, पदविका प्रमाणपत्रधारकांची अर्हता भारतीय पशुवैद्यक परिषद पहिल्या अनुूसुचित समाविष्ट करावी, विमा सुरक्षा कवच, रिक्त पदे भरावीत, पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम सुरू करावा अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत.
निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष डॉ. भगवान पाटील, डॉ. राजेंद्र बोरसे, डॉ. कैलास सुलाणे, डॉ. मनोहर पगारे, डॉ. कमलाकर बेंडकोळी आदी उपस्थित होते.
===Photopath===
160621\16nsk_37_16062021_13.jpg
===Caption===
निवेदन देतांना संघटनेचे अध्यक्ष डॉ. भगवान पाटील, डॉ. राजेंद्र बोरसे, डॉ. कैलास सुलाणे, डॉ. मनोहर पगारे, डॉ. कमलाकर बेंडकोळी आदि