डायरी व्यवसायावर नोटाबंदीची संक्रांत
By Admin | Updated: January 2, 2017 01:03 IST2017-01-02T01:03:33+5:302017-01-02T01:03:49+5:30
विक्रे ते हवालदिल : व्यवसाय डबघाईला आल्याने व्यावसायिक चिंताग्रस्त

डायरी व्यवसायावर नोटाबंदीची संक्रांत
नाशिक : वेगवेगळ्या चांगल्या वाईट आठवणींचे क्षण शब्दात साठवून ठेवणाऱ्यांसाठी तसेच दैनंदिन कामकाजातून महत्त्वाची आणि अगदी क्षुल्लक बाबही राहून जाऊ नये याची कटाक्षाने काळजी घेऊन टिपण काढणाऱ्यांसाठी डायरी ही अमूल्य ठेवा असते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासूनच विद्यार्थी, व्यावसायिक व साहित्यिक पत्रकार आदि विविध प्रकारच्या डायरी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळते.
तसेच नववर्षाच्या निमित्ताने डायरीची भेट देण्याचीही प्रथा असल्याने अशा डायरीला वर्षाअखेरीस मोठी मागणी असते, परंतु यावर्षी या डायरी व्यवसायालाच नोटाबंदीचा फटका बसला असून केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणामुळे यंदा डायरी विक्रेत्यांवर यावर्षी नोटाबंदीची संक्रांत आली आहे. वेगळवेळ्या चांगल्या, वाईट आठवणींना समेटून २०१६ वर्ष मावळीतीला जात असताना या वर्षात केंद्र सरकाने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाने इतर व्यवसायांबरोबर डायरी व्यवसायही रसातळाला नेला आहे. नववर्ष अवघे दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या कालावधीत नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या चलनटंचाईचा फटका डायरी
विक्रे त्यांना बसला आहे.