‘नो सेल्फी झोन’च बनत आहेत सेल्फी झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:20 AM2019-07-31T00:20:32+5:302019-07-31T00:21:19+5:30

पावसाळा सुरू झाला की पर्यटनस्थळांना एक वेगळीच झळाळी येते त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनाला अधिक महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे पावसाळ्यात धरणे, तलाव, धबधबे, डोंगर व टेकडीच्या परिसरांना पर्यटनाला अधिक महत्त्व दिले जाते. तसेच धार्मिक स्थळांकडेही पर्यटकांचा मोठा कल असतो.

 'No selfie zones' are becoming selfie zones | ‘नो सेल्फी झोन’च बनत आहेत सेल्फी झोन

‘नो सेल्फी झोन’च बनत आहेत सेल्फी झोन

Next

नाशिक : पावसाळा सुरू झाला की पर्यटनस्थळांना एक वेगळीच झळाळी येते त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनाला अधिक महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे पावसाळ्यात धरणे, तलाव, धबधबे, डोंगर व टेकडीच्या परिसरांना पर्यटनाला अधिक महत्त्व दिले जाते. तसेच धार्मिक स्थळांकडेही पर्यटकांचा मोठा कल असतो. त्यामुळे पावसाळ्यात अशा ठिकाणी नागरिकांबरोबरच पर्यटकांची गर्दी अधिक होत असते. पण ही स्थळे मुख्यत: धोकादायक असतात त्यात पावसाळ्यात या स्थळांवरील स्थिती अधिक गंभीर बनत असते. त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक ठरतात.
दरम्यान, दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात होणारा पावसामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बहरली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना कार्यरत असणे गरजेचे आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने मागील महिन्यातच सर्वच शासकीय कार्यालयांना तसे आदेशही दिले गेले असतांनी आपापल्या परिक्षेत्रात सुरक्षेच्या उपाययोजनांची कमतरता जाणवत आहे. गत दोन दिवसांपासून सुरू असेलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकतेचे आवाहन करण्यात आले आहे. पण काही अतिउत्साही पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी घेत असल्याचे दिसून येत आहे. सदर स्थळांवर काही प्रमाणात पोलिसांची गस्त असून, सुद्धा धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेऊन या विभागांच्या जबाबदाºया निश्चित करून दिल्या आहेत, पण पर्यटकांची गर्दी बघता अशा ठिकाणी उपलब्ध मनुष्यबळाला मर्यादा येत आहेत. तसेच काही पर्यटनस्थळांवर ‘नो सेल्फी झोन’चे फलकही दिसून येत नाही. त्यामुळे पर्यटकांनी थेट घसरणीच्या ठिकाणी जाऊन सेल्फी घेण्याची मजल वाढली आहे. यात तरुण-तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
‘नो सेल्फी झोन’ची ठिकाणे
रामकुंड, तपोवन, सोमेश्वर धबधबा, सोमेश्वर मंदिर, पांडवलेणी, चामरलेणी, नवश्या गणपती, संत गाडगे महाराज पूल, व्हिक्टोरिया पूल, चित्ते पूल, चोपडा लॉन्स पूल, गंगापूर धरण, आशावाडी किल्ला, रामशेज किल्ला, दुगारवाडी धबधबा, पहिने परिसर, ब्रह्मगिरी, अंजनेरी, वाघेरा घाट, हरिहर गड, अशोका धबधबा, कसारा घाट, घाटनदेवी, वैतरणा धरण, भावली धरण, दारणा धरण आदी.
सूचनांकडे केले जाते दुर्लक्ष
सेल्फी झोन, नो सेल्फी झोन, धोकादायक ठिकाणे, अरुंद रस्ता, वाहतुकीस अडचण, कुठल्या बाजूने जावे, कुठून जाऊ नये, अशी माहिती देणारे फलक काही ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे पर्यटकांना धोकादायक स्थळांची माहिती मिळत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. त्यात अशा ठिकाणी तळीरामांची संख्याही जास्त प्रमाणात आढळून येते. त्यामुळे असे पर्यटक जिवाची तमा न बाळगता धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी, फोटो काढत असतात.

Web Title:  'No selfie zones' are becoming selfie zones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.