नैसर्गिक गर्भपाताच्या प्रमाणात नाही वाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:56+5:302021-07-22T04:10:56+5:30
नाशिक : नैसर्गिकरित्या होणाऱ्या गर्भपाताला वैद्यकीय परिभाषेत मिसकॅरेज असे संबोधले जाते. सर्वसाधारणपणे गर्भधारणेपासून २२ आठवड्यांच्या आत जर कोणत्याही कारणाने ...

नैसर्गिक गर्भपाताच्या प्रमाणात नाही वाढ !
नाशिक : नैसर्गिकरित्या होणाऱ्या गर्भपाताला वैद्यकीय परिभाषेत मिसकॅरेज असे संबोधले जाते. सर्वसाधारणपणे गर्भधारणेपासून २२ आठवड्यांच्या आत जर कोणत्याही कारणाने गर्भ गर्भाशयाबाहेर पडला तर त्याला गर्भपात समजले जाते; मात्र कोरोना काळात ग्रामीण रुग्णालयांनीदेखील सेवा सुरुच ठेवल्याने एकूणातच गर्भवतींना फारशी समस्या येणे किंवा नैसर्गिक गर्भपाताचे प्रमाण वाढण्याची समस्या आली नाही.
जनुकीय यंत्रणेतील गुणसूत्रांतील रचनेच्या दोषामुळे गर्भपात संभवतो, गर्भधारणा झाल्यानंतरच्या पहिल्या दोन आठवड्यात मातेच्या शरीरातील संप्रेरके विशेषत: प्रोजेस्टेरॉनची योग्य पातळी नसेल तरी गर्भपात होऊ शकतो. रुबेला, हर्पिस, टॉकझोप्लाझमोसिस, सायटोमेगॅलो व्हायरस असे जंतुसंसर्ग जर गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत मातेला झाल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते. त्याशिवाय जंतूसंसर्ग, आहारात योग्य अन्न घटकांचा अभाव, प्रारंभीच्या टप्प्यात प्रचंड शारीरिक कष्टाचे काम, काही दुर्मिळ घटनांमध्ये महिलेला जन्मत:च जर गर्भाशयाच्या रचनेत दोष असेल तर गर्भ बहुतेकवेळा पहिल्या तीन महिन्यांपर्यंत वाढतो; पण नंतरच्या तीन महिन्यांत गर्भपोकळीतील दोषामुळे गर्भपात होऊ शकतो.
इन्फो
गर्भपाताची सर्वसाधारण लक्षणे
ओटीपोटात दुखणे. पाठीत दुखणे. अधिक रक्तस्राव होणे, काळसर रंगाचा रक्तस्राव होणे यासह अन्य काही गर्भपाताची लक्षणे असतात. रक्ताची तपासणी व मुख्यत: सोनोग्राफी करावीच लागते. सोनोग्राफी केल्यावरच गर्भाची स्थिती समजते. योग्य निदान होऊ शकते. जर गर्भ जिवंत असेल, हृदयाचे ठोके दिसत असतील तर त्याच्या वाढीसाठी व रक्तस्राव थांबण्यासाठी वेगवेगळ्या औषधयोजना कराव्या लागतात; पण जर गर्भाची वाढ पूर्णपणे थांबली असल्यास किंवा काही भाग बाहेर पडून गेला असल्यास ताबडतोब गर्भाशय पूर्ण रिकामे करण्यासाठी औषधे, शस्त्रक्रिया करावी लागते. तसे केले नाही तर सतत रक्तस्राव होत राहिल्याने मातेच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
----------------
ही डमी आहे.