लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : यापुढे कोणतीही सरकारी बाकी भरायची नाही, असा ठराव पाटोदा येथे आयोजित शेतकरी एल्गार परीषदेत करण्यात आला आहे. शेतकरी एल्गार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात जनजागृती करण्यात येत असून, राज्यात एकाच दिवशी प्रत्येक प्रांत कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतू पाटील झांबरे यांनी दिली.राज्यात परतीच्या पावसाने संपूर्ण शेतीचे स्मशान झाले असून, शासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यात शर्ती घातल्याने अनेक शेतकरी या भरपाईपासून वंचित राहणार असल्याने शासनाने कोणतेही निकष न लावता सरसकट पंचनामे करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. राज्यात मागील वर्षाचा दुष्काळ आणि यंदाच्या परतीच्या पावसाने शेतक्यांच्या हातातोंडाशी आलेल्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले. या पाश्वभूमीवर होऊ घातलेल्या आॅक्टोबर मार्च महिन्यातील इ. दहावी, बारावीच्या परीक्षांसह डिग्री, पदवी पदवीत्त्युर परीक्षांची फी राज्य शासनाने माफ करावी, अशी मागणी शेतकरी एल्गार परिषदेचे संयोजक, शेतकरी नेते प्रा. शिवाजी भालेराव यांनी यावेळी केली.यावेळी कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड, छावाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे, सूर्यभान नाईकवाडे आदींनी या परिषदेला मार्गदशन केले.शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, शेतीसाठी २४ तास अखंडित वीजपुरवठा करावा, संपूर्ण कर्ज माफी करावी यासह विविध ठराव यावेळी करण्यात आले. यावेळी जाफर पठाण, रमेश बोरणारे, प्रभाकर बोरनारे, साहेबराव आहेर, विलास पवार, उस्मान शेख, मारु ती घोरपडे, कैलास नाईकवाडे, रघुनाथ नाईकवाडे, भास्कर बोराडे, आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(फोटो ०५ पाटोदा)मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने काही शेतकºयांनी शेतातील नुकसान झालेली पिके जमा करून खळ्यावर जमा करून ठेवली अशा शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे होत नसल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त करीत माणूस मेल्यावर मढ किती दिवस झाकून ठेवायचा, असा संतप्त सवाल शेतकºयांनी या परिषदेत उपस्थित करीत शासनाचा निषेध केला.
कोणतीही सरकारी बाकी भरायची नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:59 IST
पाटोदा : यापुढे कोणतीही सरकारी बाकी भरायची नाही, असा ठराव पाटोदा येथे आयोजित शेतकरी एल्गार परीषदेत करण्यात आला आहे. शेतकरी एल्गार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात जनजागृती करण्यात येत असून, राज्यात एकाच दिवशी प्रत्येक प्रांत कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतू पाटील झांबरे यांनी दिली.
कोणतीही सरकारी बाकी भरायची नाही
ठळक मुद्देपाटोदा : शेतकरी एल्गार परिषदेत ठराव