नो कोरोना : नाशिकमधील ते पाच संशयितही निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 09:53 PM2020-03-12T21:53:03+5:302020-03-12T21:56:54+5:30

या पाचही संशयितांच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.

No Corona: Those five suspects in Nashik are also negative | नो कोरोना : नाशिकमधील ते पाच संशयितही निगेटिव्ह

नो कोरोना : नाशिकमधील ते पाच संशयितही निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देते सर्व नमुने निगेटिव्ह प्राप्त झाले आहेअफवा जर पसरविली तर त्यांच्यावर कारवाई

नाशिक : परदेशवारी करून आल्यानंतर सर्दी-खोकल्याचा त्रास उद्भवलेल्या पाच संशयितांना जिल्हा शासकिय रूग्णालयाच्या कोरोना विलगीकरण कक्षात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या पाचही संशयितांच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.
जिल्हा शासकिय रूग्णालयात काही दिवसांपुर्वी कोरोनाग्रस्त देशांमधून आलेल्या पाच संशयितांना त्रास उद्भवला होता. त्यामुळे त्यांना जिल्हा शासकिय रू ग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्त्रावचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. ते सर्व नमुने निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात कोठेही कोरोना रुग्ण नसून याबाबत कुठल्याही प्रकारची अफवा जर कोणी पसरविली तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षकांना दिल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे. आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सायबर सेलच्या चमूला सोशलमिडियावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे जर कोणी कोरोना व्हायरससंदर्भात खोडशाळपणा करणारे लघुसंदेश पाठविताना आढळून आल्यास तत्काळ कारवाई केली जाणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले.

Web Title: No Corona: Those five suspects in Nashik are also negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.