मनपा निवडणूक : मालेगावात शिवसेनेची 9 जागांवर आघाडी
By Admin | Updated: May 26, 2017 13:18 IST2017-05-26T11:57:37+5:302017-05-26T13:18:25+5:30
मालेगाव महापालिकेत आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने 11 जागांवर विजय मिळविला असून 30 जागांवर आघाडी घेतली आहे.

मनपा निवडणूक : मालेगावात शिवसेनेची 9 जागांवर आघाडी
ऑनलाइन लोकमत
मालेगाव (नाशिक), दि. 26 - मालेगाव महापालिकेत आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने 11 जागांवर विजय मिळविला असून 30 जागांवर आघाडी घेतली आहे.
तर नऊ जागांवर शिवसेनेने आघाडी घेतली आहे. मतमोजणी सुरू असून मतमोजणी केंद्रांभोवती उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी केली आहे. प्रभाग 16 मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार आघाडीवर आहे.
प्रभाग 5 मधून काँग्रेसचे नजीर अहमद इरशाद अहमद, जैबुन्नीसा नुरूल्लाह, कमरून्नीसा मोहम्मद रिझवान आणि फकीर मोहम्मद शेख सादिक विजयी झाले आहेत.
याठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे. मतमोजणी केंद्रांभोवती उमेदवारांनी समर्थकांसह गर्दी केली असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुधवारी मालेगाव महानगरपालिकेसाठी 60 टक्के मतदान झाले होते.