शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

नितीन परदेशीचा खून आर्थिक वादातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:49 AM

गत आठवड्यात म्हसरूळजवळील बोरगड (एकतानगर) येथील नितीन दिलीप परदेशी या युवकाच्या खुनाचे कारण शोधण्यास म्हसरूळ पोलिसांना यश आले आहे. संशयित मयूर जाधव व परदेशी यांच्यात आर्थिक वाद झाला होता त्या वादातूनच परदेशीचा डोक्यात गोळी झाडून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल जप्त केले आहे.

पंचवटी : गत आठवड्यात म्हसरूळजवळील बोरगड (एकतानगर) येथील नितीन दिलीप परदेशी या युवकाच्या खुनाचे कारण शोधण्यास म्हसरूळ पोलिसांना यश आले आहे. संशयित मयूर जाधव व परदेशी यांच्यात आर्थिक वाद झाला होता त्या वादातूनच परदेशीचा डोक्यात गोळी झाडून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल जप्त केले आहे.एकतानगरमधील सातिआसरा मंदिराजवळच्या लोखंडी बाकावर बसलेल्या नितीन परदेशी या युवकावर बुधवारी (दि.६ जून) रात्रीच्या सुमारास संशयितांनी गोळी झाडली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या परदेशीचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला़  या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी मखमलाबाद लिंकरोडवरील वेदश्री सोसायटीत राहणारा विजयकुमार पुंडलिक गांगोडे, मयूर राजाभाऊ जाधव (रा़ जुई, एकता अपार्टमेंट, एकतानगर) व हितेश ऊर्फ चिक्या रवींद्र केदार (वेदांत अपार्टमेंट, चाणक्यपुरी) या तिघांना अटक केली़पोलिसांनी केलेल्या चौकशीत मयत नितीन परदेशी याने काही दिवसांपूर्वी संशयित मयूर जाधव याची शेवरलेट कंपनीची कार भुसावळला नेली होती़ या गाडीचा परदेशी याच्याकडून अपघात झाल्याने ती चारचाकी भुसावळला जमा असून, परदेशी याने जाधवकडून काही रक्कम घेतली होती.  अपघातात जमा असलेली कार सोडविण्यासाठी तसेच घेतलेले पैसे परत द्यावे यासाठी संशयित जाधव याने गेल्या अनेक दिवसांपासून परदेशीकडे तगादा लावला होता़ मात्र, परदेशी पैसे देत नसल्याने दोघांत वाद झाले होते.गावठी पिस्तूल जप्तबुधवारी (दि.६ जून) रात्री संशयित व मयत नितीन परदेशी यांनी एकतानगरला मद्यपान केले़ यानंतर काहीवेळाने परदेशी हा लोखंडी बाकावर एकटाच बसल्याची संधी साधून संशयितांनी हातातील गावठी पिस्तुलातून परदेशी याच्या डोक्यात गोळी झाडल्याची कबुली दिली़ पोलिसांनी या खुनातील संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूलही जप्त केले आहे.

टॅग्स :Murderखूनnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय