शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

कॉँग्रेसच्या निर्मला गावीत यांचा आमदारकीचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 5:06 PM

विधानसभा अध्यक्षांकडे सुपुर्द : आज शिवसेनेत प्रवेश

ठळक मुद्देआमदार निर्मला गावित यांनी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाडिव-हे : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघातील कॉँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.२०) होणारा शिवसेना प्रवेश सेना आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे स्थगित होऊन तो आता बुधवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता होणार आहे.आमदार निर्मला गावित यांनी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या सेना प्रवेशाचा मुहूर्त मंगळवारी दुपारी ४ वाजता मातोश्रीवर निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार, मतदारसंघातून मोठ्या संख्येने गावित समर्थक मुंबईकडे रवाना होणार होते. परंतु, सेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे मातोश्रीवरील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामुळे निर्मला गावित यांचाही पक्षप्रवेश तूर्त स्थगित करण्यात आला. आता हा प्रवेश सोहळा बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान निर्मला गावीत यांच्या शिवसेना प्रवेशासाठी शेकडो कार्यकर्र्त्यानी घोटी टोलनाक्यावरून मुंबईकडे मार्गक्र मण केले होते. मंगळवारी गावित यांनी विधिमंडळात जाऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपुर्द करत पक्षांतरात कुठलीही अडचण उद्भवू नये याची दक्षता घेतली. यावेळी गावित यांच्या समवेत राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक