निऱ्हाळे-निमोण रस्ता हरवला चिखलात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 18:06 IST2021-01-11T18:05:29+5:302021-01-11T18:06:06+5:30

निऱ्हाळे : नाशिक व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या निऱ्हाळे ते निमोण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने, वाहन चालविताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सदर रस्ता दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Nirhale-Nimon road lost in the mud! | निऱ्हाळे-निमोण रस्ता हरवला चिखलात !

निऱ्हाळे-निमोण रस्ता हरवला चिखलात !

पावसाचे पाणी साचल्यामुळे निऱ्हाळे ते निर्माण रस्त्यावर सर्वत्र चिखल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी वाहनांसाठी गाळाने भरून वाहने त्यात अडकून पडत आहेत, तसेच या रस्त्याची आधीच खड्ड्यांमुळे दुरवस्था झालेली होती. त्यात पावसाच्या पाण्याने जागोजागी असलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. सदर रस्त्याची कित्येक दिवसांपासून दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे पादचारी व वाहनचालकांची गैरसोय होत आहे. खड्डे व त्यात साचलेले पाणी आणि त्या ठिकाणी तयार झालेल्या चिखलामुळे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील शिवाजी सांगळे, देविदास वाघ, सुरेश केकाणे, सुभाष दराडे, सुरेश सांगळे, ज्ञानेश्ववर सांगळे, खंडू वाघ, बाळासाहेब सांगळे आदींनी केली आहे.

Web Title: Nirhale-Nimon road lost in the mud!