निऱ्हाळे फत्तेपूर ग्रामस्थांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:14 IST2021-07-30T04:14:37+5:302021-07-30T04:14:37+5:30
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथील तरुण मंडळीने एकत्र येऊन कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा ...

निऱ्हाळे फत्तेपूर ग्रामस्थांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
सिन्नर : तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथील तरुण मंडळीने एकत्र येऊन कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात दिला. गुरुवारी (दि. २९) पूरग्रस्तांना अन्नधान्य व अन्य वस्तूचे वाटप महाड येथे करण्यात आले.
सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे फत्तेपूर येथील ग्रामस्थ काही ना काही नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात कायम चर्चेत असतात. नुकताच कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही गावात पुरामुळे अनेक घरे वाहून जात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ‘एक हात मदतीचा’ उपक्रम हाती घेण्यात आला व गावातील युवकांनी एकत्र येऊन गावा गावात फिरून तांदूळ, गहू, बिस्किटे, पाण्याचे बाॅक्स, कपडे, चादरी, कोलगेट, साबण, टाॅवेल, साड्या, साखर, चहा पावडर, संसारोपयोगी वस्तू जमा केल्या. गुरुवारी पहाटे भरलेल्या वस्तूंचा टेम्पो महाड येथे नेऊन जेथे कोणाचाच मदतीचा हात पोहोचला नाही तेथे जाऊन वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
फोटो- २९ निऱ्हाळे फत्तेपूर
महाड येथे पूरग्रस्तांना साहित्य वाटप करताना निऱ्हाळे फत्तेपूर येथील तरुण.
290721\29nsk_21_29072021_13.jpg
फोटो- २९ निऱ्हाळे फत्तेपूर महाड येथे पुरग्रस्तांना साहित्य वाटप करताना निऱ्हाळे फत्तेपूर येथील तरूण.