त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुसरा दिवसही निरंक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:04 IST2020-12-24T22:06:54+5:302020-12-25T01:04:31+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पेगलवाडी ना., शिवाजीनगर व डहाळेवाडी या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवसदेखील निरंक गेल्याने मतदारांत आश्चर्य व्यक्त होत आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुसरा दिवसही निरंक
ठळक मुद्देमतदारांत आश्चर्य व्यक्त होत आहे.
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पेगलवाडी ना., शिवाजीनगर व डहाळेवाडी या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवसदेखील निरंक गेल्याने मतदारांत आश्चर्य व्यक्त होत आहे.
उद्या शुक्रवार ख्रिसमस डे, परवा शनिवार व रविवार अशा तीन दिवस सलग सुट्या असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. त्यानंतर दि. २८ ते ३० या तीन दिवसांचीच मुदत उरणार असल्याने उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे.