शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

निफाडच्या शारदा काळेने कोलंबोत फडकविला तिरंगा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 1:19 AM

निफाड : शालेय जीवनापासून एखाद्या खेळाची आवड जपत भविष्यात त्यात प्रावीण्य मिळविणे ही तशी नित्याचीच बाब. परंतु आयुष्यात घडलेल्या दु:खद प्रसंगानंतर स्वत:ला सावरणारे आणि पदवीधर झाल्यानंतर धावण्याच्या आंतरराष्टÑीय स्पर्धेत स्वत:चा ठसा उमटविणारे दुर्मीळ असतात. निफाड येथील श्रीमती शारदा मनोज काळे ही महिला खेळाडूदेखील त्यापैकीच एक.

ठळक मुद्देजिद्दीपुढे आकाश ठेंगणे : अ‍ॅथलेटिक्स मास्टर इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत केली दोन सुवर्णसह एका कांस्यपदकाची कमाई

लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड : शालेय जीवनापासून एखाद्या खेळाची आवड जपत भविष्यात त्यात प्रावीण्य मिळविणे ही तशी नित्याचीच बाब. परंतु आयुष्यात घडलेल्या दु:खद प्रसंगानंतर स्वत:ला सावरणारे आणि पदवीधर झाल्यानंतर धावण्याच्या आंतरराष्टÑीय स्पर्धेत स्वत:चा ठसा उमटविणारे दुर्मीळ असतात. निफाड येथील श्रीमती शारदा मनोज काळे ही महिला खेळाडूदेखील त्यापैकीच एक.श्रीलंकेतील मर्कंटाइल अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनच्या वतीने कोलंबो येथे अ‍ॅथलेटिक्स मास्टर इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा सोमवारी पार पडल्या. या स्पर्धेत निफाड येथील श्रीमती शारदा मनोज काळे यांनी ३० ते ३५ वयोगटातील ८०० मीटर व १५०० मीटर या दोन्ही स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकावले तर ४०० मीटरच्या स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. ८०० मीटरची स्पर्धा २ मिनिट ५८ सेकंदात, १५०० मीटर स्पर्धा ६ मिनिटात तर ४०० मीटर स्पर्धा १ मिनिट ८ सेकंदात पूर्ण केली. अवघ्या चार सेकंदासाठी ४०० मीटर स्पर्धेतील त्यांचे सुवर्णपदक हुकले.पदवीपर्यंतच्या शिक्षणानंतर धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यावा, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. ‘लोकमत’तर्फे नाशिक येथे पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचीही त्यांना संधी मिळाली. त्यानंतर इंडिया मास्टर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसह अन्य स्पर्धेत त्यांनी अनेक बक्षिसे पटकावलेली आहेत. धावण्याच्या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करण्यासाठी त्यांना निफाड तालुक्यातील अनेक व्यक्ती, सहकारी संस्थांनी आर्थिक पाठबळ उभे केले. त्यामुळेच त्या स्पर्धांमध्ये जिद्दीने धावू शकत आहेत. काळे यांनी आपल्या यशाचे श्रेय आर्थिक आधार देणाऱ्या संस्था, प्रशिक्षक तसेच निफाड येथील ‘लोकमत सखी मंच’च्या सदस्यांनी दिलेल्या मानसिक बळाला देतात.प्रतिकूल परिस्थितीवर मात...४शारदा काळे या मूळच्या येवला तालुक्यातील जळुके येथील रहिवाशी असून, सध्या त्या निफाडच्या जनार्दन स्वामी नगरात आजोबा नरहरी सानप यांच्याकडे वास्तव्यास आहेत. सात वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले, त्यावेळी त्यांचे शिक्षण केवळ बारावीपर्यंत झालेले होते. वैधव्य आल्यानंतर कोलमडून न पडता त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. स्वत:च्या हिमतीवर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले व मुले अनिश आणि आर्यन यांच्यामागे त्या खंबीरपणे उभ्या आहेत. निफाड येथील इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये दोन्ही मुले शिक्षण घेत असून, त्यांची भविष्यात बी.पीएड.ची पदवी घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहायची मनीषा आहे. श्रीलंकेत धावण्याच्या स्पर्धेसाठी जाण्यापूर्वी त्यांनी नाशिक येथे प्रशिक्षक सिद्धार्थ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. राष्ट्रीय स्तरावर धावण्याच्या स्पर्धेत बक्षीस मिळवायचे याच इराद्याने त्या श्रीलंकेला गेल्या होत्या. परदेशात धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. दोन सुवर्ण आणि एक कांस्यपदक मिळाल्यानंतर आनंद होणे स्वाभाविकच आहे. मात्र मी पूर्णपणे समाधानी नाही. टाटा मॅरेथॉनच्या २१ किमीच्या शर्यतीत जेव्हा मी बाजी मारेन, तेव्हाच खºया अर्थाने मला समाधान लाभेल. स्पर्धांमध्ये तशी मी अजून खूप मागे आहे. मला अजून खूप लांब बल्ला गाठायचा आहे. एशियन स्पर्धेसह अन्य नामांकित स्पर्धांमध्ये विजय मिळवून मला सिद्ध करायचे आहे.- शारदा मनोज काळेधावण्याच्या स्पर्धेत आपल्याला यश मिळवायचे ही तिची जिद्द होती. तिने यासाठी खूप मेहनत घेतली, तिला मिळवलेल्या यशाबद्दल आनंद वाटला.- नरहरी सुखदेव सानप (आजोबा)