ठळक मुद्देअन्न व पाण्यासाठी करावा लागत असलेला संघर्ष पाहून मदतीचा हात दिला.
देवगाव : निफाड तालुका मुस्लिम कमिटीने आपले सामाजिक दातृत्व म्हणून चाटोरी गावातील पुरग्रस्त विस्थापितांना पुराचे पाणी ओसरल्यानंतर अन्न व पाण्यासाठी करावा लागत असलेला संघर्ष पाहून मदतीचा हात दिला.निफाड पासून अवघ्या १७ कि. मी. अंतरावर असलेल्या चाटोरी गावात गोदावरीच्या पाण्याने थैमान घातल्यामुळे लोकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले. त्यामुळे चाटोरीगावच्या मुस्लिम कमिटी सदस्य बशीर शेख यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तालुका कमिटीला कळविले व सहकार्याची मागणी केली. थोड्या अवधीत निफाड तालुका कमिटीचे सदस्य इरफान सय्यद, शकील पठाण, अब्दुल शेख, वसीम पठाण, नाशाद सय्यद, शमशु शेख यांनी पिण्याचे पाणी आणि पूरग्रस्तांना अन्नपदार्थ पोहोचविले.