निफाड उपजिल्हा रुग्णालय लवकरच अद्ययावत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST2020-12-05T04:21:42+5:302020-12-05T04:21:42+5:30
निफाड : शहर व परिसरातील २०-२५ गावांच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात सध्या उपलब्ध असलेली ५० बेडची सुविधा अपूर्ण पडत असून, ...

निफाड उपजिल्हा रुग्णालय लवकरच अद्ययावत करणार
निफाड : शहर व परिसरातील २०-२५ गावांच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात सध्या उपलब्ध असलेली ५० बेडची सुविधा अपूर्ण पडत असून, निफाड उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० बेडची व्हावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून, तो लवकरच मंजूर होईल, असे प्रतिपादन आमदार दिलीप बनकर यांनी केले.
निफाड उपजिल्हा रुग्णालयात आयोजित रुग्णकल्याण समितीच्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रुग्णकल्याण समितीच्या सहअध्यक्ष व प्रांत डॉ. अर्चना पठारे होत्या. याप्रसंगी निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र डोखळे, प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, विभागीय वैद्यकीय अधिकारी पवार, गटविकास अधिकारी संदीप कराड, वैद्यकीय अधिकारी सुनील राठोर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे, मुख्याधिकारी श्रेया देवचक्के, लासलगाव कृउबाचे संचालक सुभाष कराड, राजेंद्र बोरगुडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर शेलार, महेश जंगम, सचिन खडताळे, बंडू कुंदे, सुहास सुरळीकर, उन्मेष डुबरे, उत्तम कुंदे व रुग्ण कल्याण समितीचे सदस्य उपस्थित होते.
===Photopath===
041220\04nsk_31_04122020_13.jpg
===Caption===
निफाड उपजिल्हा रुग्णालयात आयोजित रुग्णकल्याण समितीच्या सभेत बोलतांना आमदार दिलीप बनकर. समवेत प्रांत अर्चना पठारे, राजेंद्र डोखळे, सागर कुंदे, संदीप कराड, सुनील राठोर , डॉ. चेतन काळे, मुख्याधिकारी श्रेया देवचक्के, सुभाष कराड आदी.०४ निफाड २