निफाडला महिलेच्या गळ्यातील पोत लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 01:07 IST2020-12-24T22:35:03+5:302020-12-25T01:07:05+5:30

निफाड : शहरात गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान लग्नसमारंभासाठी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत व सोन्याचा तीन पदरी शाहीहार मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी खेचून लांबवल्याची घटना घडली. या लुटीत एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लांबवल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

Niphad stretched the texture around the woman's neck | निफाडला महिलेच्या गळ्यातील पोत लांबवली

निफाडला महिलेच्या गळ्यातील पोत लांबवली

ठळक मुद्दे १० तोळे सोने लुटून पसार झाले.

निफाड : शहरात गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान लग्नसमारंभासाठी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत व सोन्याचा तीन पदरी शाहीहार मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्यांनी खेचून लांबवल्याची घटना घडली. या लुटीत एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लांबवल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

उगाव रोडपासून जवळ असलेल्या शनिमंदिर परिसरात असलेल्या रविराज मंगल कार्यालयात पुतण्याच्या लग्नासाठी मंगला रणशिंगे या नाशिक येथून आलेल्या होत्या. रणशिंगे या आपल्या नातेवाईक महिलांसोबत दुपारी १२ च्या सुमारास उगाव रोडकडून संगमेश्वर कॉलनीच्या अरुंद रस्त्याने शनिमंदिर रोडकडे जात असताना त्यांच्या समोरून मोटारसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत व सोन्याचा तीन पदरी शाहीहार ओढून असे एकूण १० तोळे सोने लुटून पसार झाले. निफाड पोलिसांनी सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Niphad stretched the texture around the woman's neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.