शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार

By admin | Updated: April 4, 2017 02:34 IST

निफाड : येथील निफाड तालुक्यातील तारुखेडले शिवारात बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.३) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

 निफाड : येथील निफाड तालुक्यातील तारुखेडले शिवारात उसाच्या शेतालगत असलेल्या घराबाहेर खेळणाऱ्या बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.३) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात बालिकेचा जागीच मृत्यू झाला.तारुखेडले शिवारात शरद जगताप यांच्या मळ्यावर राखणदार म्हणून असलेले अशोक किसन हांडगे यांची पाच वर्षांची मुलगी घराजवळ खेळत होती. यावेळी अचानकपणे उसाच्या शेतामधूनबिबट्याने येऊन बालिकेला धरून फरफटत शेतात नेले. सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर तत्काळ तिच्या आई-वडिलांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या रहिवाशांना सावध केले. त्यानंतर गावकरी हातात लाठ्या-काठ्या, बॅटरी, टेंभे घेऊन शेताच्या दिशेने गेले. सुमारे तासभर शेत पिंजून काढल्यानंतर मयत अवस्थेत गुड्डी हांडगे या पाच वर्षीय बालिकेचा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. गावकऱ्यांनी जखमी अवस्थेत गुड्डीला शेताबाहेर काढले; मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. गावाच्या सरपंचाकडून निफाड वन विभागाच्या कार्यालयाला घटनेची माहिती कळवूनदेखील रात्री साडेनऊ वाजेपर्यंत वनअधिकारी किंवा परिसरातील गस्त पथक घटनास्थळी पोहचले नव्हते. यामुळे तारुखेडले गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून, ऊ सशेतीत बिबट्यांच्या वाढत्या वास्तव्यामुळे बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. दिवसेंदिवस निफाड तालुक्यातील गोदाकाठ पंचक्रोशीमध्ये मानव-बिबट्याचा संघर्ष वाढीस लागत असून, वन विभागाकडून सातत्याने प्रयत्न करूनदेखील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. नागरिकांनी याबाबत सायंकाळनंतर अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे वनअधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मयत गुड्डीच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. तारुखेडले गावात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून हांडगे कुटुंबीयांचे दु:ख समजू शकतो; मात्र वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने रहिवाशांनी सतर्कता बाळगावी तसेच वन विभागाच्या सावधानतेच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन नाशिक पूर्व वन विभागाचे उपवनसंरक्षक एन. रामानुजम यांनी केले आहे. वन विभागाच्या नियमानुसार मयत बालिकेच्या कुटुंबाला अर्थसहाय्य केले जाईल, असेही रामानुजम म्हणाले.