निफाडचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांची अवघ्या दोन महिन्यातच बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:41 IST2020-07-28T20:29:03+5:302020-07-29T00:41:02+5:30
निफाड : निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांची अवघ्या दोन महिन्यातच नांदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाल्याने निफाड शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

निफाडचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांची अवघ्या दोन महिन्यातच बदली
निफाड : निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पंकज गोसावी यांची अवघ्या दोन महिन्यातच नांदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाल्याने निफाड शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जवळ जवळ एक वर्षांपासून निफाडला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना या शहराचा कारभार पहावा लागत होता. त्यामुळे या शहराच्या कारभारावर परिणाम होत होता. निफाडला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा म्हणून अनेक प्रयत्न झाल्यानंतर निफाड नगरपंचायतला २ महिन्यांपूर्वी म्हणजे २८ मे २०२० रोजी पंकज गोसावी यांच्या रूपाने पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले होते.
तब्बल एक वर्षभरानंतर निफाडला पूर्णवेळ मुख्याधिकारी लाभल्याने निफाडकरांनी समाधान व्यक्त केले होते. त्यानंतर या शहराचा कारभार रु ळावर येईल असे वाटत होते, पण गोसावी यांची २ महिन्यानंतर म्हणजे २८ जुलै २०२० रोजी बदली झाली. गोसावी हे निफाडमध्ये रु ळायच्या आतच यांची अचानक बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पंकज गोसावी यांची बदली झाल्यामुळे निफाड शहराला नवीन मुख्याधिकारी कधी मिळणार याची प्रतीक्षा निफाडकरांना आहे.