सरदवाडीतील नऊ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 17:26 IST2019-06-26T17:25:56+5:302019-06-26T17:26:29+5:30
सिन्नर : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तालुक्यातील सरदवाडी येथील प्राथमिक विद्यामंदिरातील पाचवी व आठवीतील नऊ विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च माध्यमिक व माध्यमिक शिष्यवत्ती परिक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.

सरदवाडीतील नऊ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत
पाचवीतील कादंबरी रोहोम हिने २३६ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत २० वा, तसेच तालुक्यात आणि नाशिक शिक्षण प्रसारक संस्थेत तृतीय क्रमांक पटकावला. आठवीतील संपदा शिरोळेने २४० गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत १४ वा, तसेच तालुक्यात आणि संस्थेत द्वितीय क्रमांक पटकावला. पाचवी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे प्रसाद झगडे (२१४) जिल्ह्यात ७३ वा, दिव्या सानप (२०२) जिल्ह्यात १४२ वी, ओंकार मांडे (१९४) जिल्ह्यात १९४ वा, आठवी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीतील विद्यार्थी करण सातारकर (२३२) जिल्ह्यात २१ वा, अभिषेक फड (२०६) जिल्ह्यात ८५वा, यश खैरनार (१८०) जिल्ह्यात २२८ वा, मयूर नाकवे (१७६) जिल्ह्यात २७५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुरेखा जेजुरकर, योगेश वैष्णव, लक्ष्मण रेवगडे, शंकर बेणके, आशा डहाके, सुषमा भानगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.