आजोबांसह कुटुंबातील नऊ जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:23 IST2021-05-05T04:23:49+5:302021-05-05T04:23:49+5:30
पाटील कुटुंबीयांत वडील माधवराव सुपडू पाटील (७६), भाऊ नितीन माधवराव पाटील (५१), वहिनी प्रमिला नितीन पाटील (४३), पत्नी ...

आजोबांसह कुटुंबातील नऊ जणांची कोरोनावर मात
पाटील कुटुंबीयांत वडील माधवराव सुपडू पाटील (७६), भाऊ नितीन माधवराव पाटील (५१), वहिनी प्रमिला नितीन पाटील (४३), पत्नी रूपाली राजेंद्र पाटील (३३), मुलगी निधी राजेंद्र पाटील (१३), मुलगी ध्वनी राजेंद्र पाटील (९), ज्योती प्रदीप सोनवणे (४५), मेहुणे प्रदीप महारु सोनवणे (४६) व लीना नितीन पाटील, पुतणी (१८) असे एकाच घरातील एकूण नऊ व्यक्ती बाधित झाले होते. घरातील एकामागून एक असे ५ सदस्य दवाखान्यात दाखल झाले होते तर ४ रुग्ण घरीच क्वारंटाइन होते. वृद्ध वडील, पत्नी, वहिनी, बहीण, मेहुणे असे ५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते. यात राजेंद्र पाटील यांच्यावर मोठी बिकट परिस्थिती आली असताना तारेवरची कसरत करीत त्यांनी सगळ्यात अगोदर परिवारातील सर्वांना सकारात्मक राहून कोरोनाशी लढण्याचा धीर दिला व काहीही झाले तरी घाबरायचे नाही असे मानसिक मनोबल दिले. अशा कठीण काळात शेजारी, मित्र परिवार, नातेवाईक यांनी जेवणाची समस्या दूर केली. योग्य उपचार, नियमितपणे गोळ्या - औषधे, सकस आहार, नियमित व्यायामाने कोरोनावर मात करता येते याचे उत्तम उदाहरण पाटील कुटुंबीयांनी दाखवून दिले.
कोट....
आम्ही वयस्कर लोक जर हिंमत व सकारात्मक मानसिकता ठेवून कोरोनाला हरवू शकतो तर तरुणांनी अजिबात घाबरून न जाता कोरोनावर मात करावी. आपण मनाने मजबूत असाल तर कोरोना निश्चितच हारेल.
- माधवराव पाटील, मालेगाव
कोट....
पाटील परिवाराचे मनोबल खरोखरच कौतुकास्पद आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी धैर्याने ह्या कोरोनामय संकटाचा सामना केला, सर्व लोकांनी त्याचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून कोरोनावर मात करावी. - जे. पी. बच्छाव, नगरसेवक
फोटो- ०४ मालेगाव पाटील
===Photopath===
040521\04nsk_16_04052021_13.jpg
===Caption===
फोटो- ०४ मालेगाव पाटील