शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

नऊ मृत्युमुखी : नाशकात ३५८ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 20:43 IST

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिकरित्या गर्दीत अनावश्यकपणे मिसळणे टाळावे, मास्क, सॅनिटायझर चा वेळोवेळी वापर आणि सामाजिक अंतर राखण्यास प्राधान्य देणे गरजेचे

ठळक मुद्दे मंगळवारी आढळले ५३७ नवे रुग्णबुधवारपासून (दि.९) निर्बंधाची अंमलबजावणी एकुण कोरोनाबाधित रुग्णसंख्या १ लाख २७ हजार १०७वर २ हजार ३१४ चाचण्यांचे नमुने अहवाल अद्याप प्रलंबित

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने फैलावताना दिसत असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरात तसेच ग्रामीण भागात निर्बंध कडक करण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अधिकाधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.९) शहरात नव्याने ४११ तर ग्रामिण भागात ७१. मालेगावात ४१ आणि जिल्ह्याबाहेरील १४ असे एकुण ५३७ नव्या रुग्णांची भर पडली. तसेच ३५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले.नाशिक शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागला आहे. यामुळे दुकाने, मंदिरांच्या वेळा, सार्वजनिक सोहळे, लग्नसमारंभ, आठवडे बाजार यांवर निर्बंध घातले गेले आहे. बुधवारपासून (दि.९) या निर्बंधाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मार्च महिन्याचा आठवडा पुर्ण झाला असून रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाने हालचाल करत कार्यवाहीला सुरुवात केली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिकरित्या गर्दीत अनावश्यकपणे मिसळणे टाळावे, मास्क, सॅनिटायझर चा वेळोवेळी वापर आणि सामाजिक अंतर राखण्यास प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. शहरात मंगळवारी दिवसभरात ४ तर मालेगावात २ आणि ग्रामिण भागातील ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतचा कोरोनाबाधितांचा मृत्युचा आकडा २ हजार १४९ इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत एकुण कोरोनाबाधित रुग्णसंख्या १ लाख २७ हजार १०७वर पोहचली असून १ लाख २० हजार ५६२ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरित्या मातदेखील केली आहे. नाशिक शहरात ३ हजार ३५० रुग्ण तर मालेगावात ४१३ आणि ग्रामिण भागात ५९४ असे एकुण ४ हजार ३९६ रुग्ण उपचारार्थ वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. २ हजार ३१४ चाचण्यांचे नमुने अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका