निमगाव - देवपूरला बिबट्या पिंजऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 15:46 IST2020-12-29T15:46:47+5:302020-12-29T15:46:59+5:30
सिन्नर : निमगाव देवपूर येथे दीड वर्षे वयाची मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकली. आठ दिवसांपासून पिंजरा लावण्यात आला होता.

निमगाव - देवपूरला बिबट्या पिंजऱ्यात
सिन्नर : निमगाव देवपूर येथे दीड वर्षे वयाची मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकली. आठ दिवसांपासून पिंजरा लावण्यात आला होता. दरम्यान, वनविभागाने एका महिन्यात पाच बिबट्यांना जेरबंद केले आहे. तीन दिवसांपूर्वीच नळवाडी येथे पिंजऱ्यात बिबट्या अडकला होता. त्यानंतर, लगेचच निमगाव-देवपूर येथेही बिबट्याला पिंजऱ्यात अडकविण्यात वन विभागाला यश आले आहे. दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर होता. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड होऊन बसले होते. बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. त्यानंतर, २० डिसेंबरला पिंजरा लावण्यात आला. याच शिवारात दोन महिन्यांपूर्वी नर बिबट्याला वन विभागाने ताब्यात घेतले होते. आणखी एक बिबट्या असल्याची शेतकऱ्यांनी माहिती दिली. त्यानंतर, बिबट्याचा वावर दिसून आल्याने वनविभागाने पिंजरा लावला. उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक उपवनसंरक्षक ए. जे पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी अनिल साळवे, मधुकर शिंदे, वनपाल वत्सला कांबळे आदींनी बिबट्याला ताब्यात घेतले. बिबट्याला मोहदरी येथील उद्यानात ठेवण्यात आले आहे.