उत्कृष्ट उद्योगांना ‘निमा एक्सलन्स’

By Admin | Updated: June 12, 2014 01:23 IST2014-06-12T01:14:33+5:302014-06-12T01:23:16+5:30

उत्कृष्ट उद्योगांना ‘निमा एक्सलन्स’

Nima Excellence for Best Industry | उत्कृष्ट उद्योगांना ‘निमा एक्सलन्स’

उत्कृष्ट उद्योगांना ‘निमा एक्सलन्स’

 

सातपूर : उद्योगांना केलेली प्रगती, योगदान, कामगार कर्मचाऱ्यांसाठी निर्धार केलेले सौहार्दपूर्ण संबंध, दर्जेदार उत्पादन आणि सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान या सर्व बाबींचा विचार करून उत्कृष्ट उद्योगांना निमाच्या वतीने आज शानदार सोहळ्यात निमा एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
हॉटेल ताज रेसिडेन्सी येथे ‘निमा एक्सलन्स अवॉर्ड २०१४’ या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष जे. जी. कुलकर्णी, एच.ए.एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एस. सुब्रम्हण्यम्, एक्सलन्स अवॉर्डचे मुख्य परीक्षक महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण, निमा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अशोक राजवाडे, निमा अध्यक्ष मनिष कोठारी, सरचिटणीस मंगेश पाटणकर आदि उपस्थित होते. जिल्ह्यातील उद्योगांनी एक्सलन्स अवॉर्डसाठी नामांकन दाखल केले होते. परिक्षक म्हणून हिरामण अहेर, राजन निंढे, राजीव देशपांडे यांची नेमणूक करण्यात आली होती. परीक्षकांनी उद्योगांना प्रत्यक्ष भेटी देऊन उद्योगांची सविस्तर माहिती घेऊन पुरस्कारासाठी उद्योगांची निवड करण्यात आल्याची माहिती निमाचे अध्यक्ष मनीष कोठारी यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. पुरस्कार समितीचे अध्यक्ष श्रीकांत बच्छाव यांनी स्वागत केले. मंगेश पाटणकर यांनी आभार मानले. सुमीत खिंवसरा यांनी सूत्रसंचालन केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक पी. पी. दाबेराव, महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालयाचे उपसंचालक आर. डी. दहिफळे, अभय कुलकर्णी, विवेक पाटील, कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव, महेंद्र कोठारी, नरेंद्र हिरावत, सुरेश माळी, ज्ञानेश्वर गोपाळे, व्हिनस वाणी, आशिष नहार, सुधीर बडगुजर, उन्मेश कुलकर्णी, समीर पटवा, मधुकर ब्राह्मणकर, किरण जैन, संतोष मंडलेचा, प्रदीप बूब, राजेंद्र छाजेड आदिंसह निमा, आयमा सदस्य उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Nima Excellence for Best Industry