नाशिकमधील दिंडोरीत शाळकरी मुलीचा निर्घृण खून, पोलिसांत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 21:02 IST2017-11-27T21:01:54+5:302017-11-27T21:02:08+5:30
सोळा ते अठरा वर्षाच्या अज्ञात शाळकरी मुलीचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह प्लॉस्टिकच्या गोणीत बांधून दिंडोरी तालुक्यातील आंबेगण शिवारातील पाझरतलावात फेकून दिल्याचे आज सायंकाळी निदर्शनास आले. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
_201707279.jpg)
नाशिकमधील दिंडोरीत शाळकरी मुलीचा निर्घृण खून, पोलिसांत गुन्हा दाखल
दिंडोरी (नाशिक) : सोळा ते अठरा वर्षाच्या अज्ञात शाळकरी मुलीचा निर्घृण खून करून तिचा मृतदेह प्लॉस्टिकच्या गोणीत बांधून दिंडोरी तालुक्यातील आंबेगण शिवारातील पाझरतलावात फेकून दिल्याचे आज सायंकाळी निदर्शनास आले. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नाशिक गुजरात महामार्गालगत असलेल्या आंबेगण शिवारातील पाझर तलावात अज्ञात शाळकरी 16 ते 18 वयोगटातील मुलीचा मृतदेह एका प्लॉस्टिकच्या गोणीत हातपाय बांधून व दगड टाकलेल्या अवस्थेत आढळला. त्या मुलीच्या अंगावर काळी जीन्स पॅन्ट असून त्यावर फूले असलेला अंगात गुलाबी कलरचा टॉप घातलेला आहे. तसेच डाव्या हाताला नेलपॉलिश लावलेली व एक कड व काळ्या रंगांची रिंग डाव्या बोटात अंगठी तसेच डोक्याला व चेहऱ्याला मार लागलेला आहे. सदर बाब पाझर तलावालगत स्थानिक पोलीस पाटील संदीप गायकवाड, उपसरपंच मिलिंद गायकवाड आणि माजी सरपंच शिवाजी पागे हे हातपाय धुण्यासाठी गेले असता त्या तलावाच्या कडेला एक गोणी आढळली व त्यातून दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी दिडोंरी पोलीस स्टेशनला माहिती दिली. दिडोंरी पो. सहाय्यक प्रवीण पाडवी, सहाय्यक बैरागी जाधव, आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच, दिंडोरी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात भादवी 302, 201 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.