सिम्बॉयसिसमध्ये निकिता गोयल प्रथम
By Admin | Updated: May 28, 2014 01:29 IST2014-05-28T01:23:29+5:302014-05-28T01:29:00+5:30
सीबीएसई निकाल : बारावीचा निकाल शंभर टक्के

सिम्बॉयसिसमध्ये निकिता गोयल प्रथम
सीबीएसई निकाल : बारावीचा निकाल शंभर टक्के
नाशिक : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसई या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, शहरात सीबीएसई बोर्ड असलेल्या सिम्बॉयसिस महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के इतका लागला आहे. महाविद्यालयातून निकिता गोयल ही विद्यार्थिनी ९५.०२ टक्केगुण मिळवून प्रथम आली.
नाशिक शहरात सीबीएसई बोर्ड असलेली सिम्बॉयसिस ही एकमेव शाळा असून, बारावी परीक्षेसाठी येथून २९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. हे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के इतका लागला आहे. शाळेतील विद्यार्थिनी निकिता गोयल हिने प्रथम क्रमांक मिळविला. दहा विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले, तर १२ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० आणि सात विद्यार्थ्यांनी ७० ते ८० टक्क्यांदरम्यान गुण मिळविले.
९० टक्क्यांच्या पुढे गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे- निकिता गोयल (९५.०२), अमित भरत शहा (९४.०४), कौस्तुभ विवेक राणे (९४.०४), गौरव राजेंद्र मंडलेचा (९३.०८), अपूर्व तिवारी (९३.०८), अक्षय गिरीश जोशी (९३.००), प्रतीक महेंद्र बागुल (९१.०८), प्रणव शेषराव पवार (९१.०८), तेजस प्रकाश नारखेडे (९०.०२), मेहल शैलेंद्रसिंग (९०.०२) टक्के गुण मिळविले आहेत. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सबरवाल तसेच संचालक डॉ. सी. आर. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या वतीने या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
संगणक अभियंता होण्याची इच्छा
मी नियमित अभ्यास केल्याने हे यश मिळाले आहे. ९० टक्के गुण मिळतील अशी अपेक्षा होती; परंतु शाळेत पहिली येईल असे वाटले नव्हते. या निकालामुळे सुखद धक्का बसला आणि तितकाच आनंदही झाला आहे. दहावीतही मला ९२.०५ टक्के इतके गुण होते. अभ्यासातील सातत्य हेच माझ्या यशाचे गमक आहे. माझा भाऊ हा संगणक अभियंता आहे, त्यामुळे मलाही या क्षेत्रात अभियंता होण्याची इच्छा आहे.
- निकिता गोयल