दिवसरात्र राबली प्रशासकीय यंत्रणा; कृती आराखड्यामुळे निवडणूक निर्विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 01:05 AM2019-10-27T01:05:06+5:302019-10-27T01:05:47+5:30

जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राबलेल्या जिल्हा आणि पोलीस प्रशासन यंत्रणेमुळे निवडणूक अत्यंत शांततेत आणि निर्विघ्न वातावरणात पार पडली. जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही, शिवाय आयोगाच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार निर्धारित वेळेत सर्व प्रक्रिया पार पडली.

 Nightly rabbi governing body; Election smooth due to action plan | दिवसरात्र राबली प्रशासकीय यंत्रणा; कृती आराखड्यामुळे निवडणूक निर्विघ्न

दिवसरात्र राबली प्रशासकीय यंत्रणा; कृती आराखड्यामुळे निवडणूक निर्विघ्न

Next

नाशिक : जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राबलेल्या जिल्हा आणि पोलीस प्रशासन यंत्रणेमुळे निवडणूक अत्यंत शांततेत आणि निर्विघ्न वातावरणात पार पडली. जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही, शिवाय आयोगाच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार निर्धारित वेळेत सर्व प्रक्रिया पार पडली. निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा प्रशासनाने मनुष्यबळाप्रमाणेच अत्याधुनियक यंत्रसामग्रीचाही यावेळी वापर केल्याने जिल्ह्यात संपर्काचे जाळे आणि नियंत्रण निर्माण करणे सुलभ झाले.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक आरती सिंह आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या अ‍ॅक्शन प्लॅनमुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणेवर कुठलाही ताण आला नाही आणि सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली. एप्रिलमध्ये लोकसभा निवडणूक संपताच आठ दिवसांनीच निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभेसाठी मतदार याद्या शुद्धीकरणासाठी मोहीम सुरू करण्यात आली. जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेले नुकसानीचे पंचनामे करण्यात प्रशासकीय यंत्रणा गुंतलेली असतानाच विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेने नियोजनाला गती दिली. याच दरम्यान शहरात राष्टÑपती आणि पंतप्रधानांचे दौरे निघाल्याने त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठीही प्रशाकीय यंत्रणेला वेळ द्यावा लागला. ग्रामीण आणि शहर पोलिसांवर बंदोबस्ताची जबाबदारी असल्याने संपूर्ण यंत्रणा दहा दिवस दौºयासाठी झटत होती. या अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंच्या दौºयाचेही चोख नियोजन करण्यात आले. विशेष म्हणजे राष्टÑपती नाशिकमध्ये मुक्कामी असल्याने दोन दिवस पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणेला अत्यंत काटेकोर नियोजन करावे लागले.
निवडणुकीचा प्रचार आणि प्रत्यक्ष मतदानापर्यंत जिल्हा प्रशासनाचे सुमारे २८ हजार अधिकारी, कर्मचारी आणि ५ हजार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी निभावली. ग्रामीण आणि शहर पोलिसांनी गुजरात पोलीस आणि होमगार्डबरोबरच निमलष्करी दलाचीही मदत घेत संपूर्ण यंत्रणेवर खडा पहारा दिला. सुमारे साडेचार हजार शहर पोलीस बळ आणि जवळपास सहा हजार पोलीस यंत्रणेचा ताफा निवडणुकीसाठी राबला.
पोलीस अधीक्षकांचा धाडसी प्रयत्न
जिल्ह्याला लाभलेल्या महिला पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी निवडणुकीत मालेगावसारख्या संवेदनशील भागात चांगली कामगिरी केली. या ठिकाणी ड्रोनचा वापर करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले, शिवाय कुविख्यात गुंडांना तडीपारही केले. शस्त्र जप्तीची कारवाई करण्याबरोबरच नाकाबंदीत हजारो वाहनांची तपासणीही त्यांनी केली. त्यामुळे संवेदनशील भागात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. मालेगावसारख्या संवेदनशील भागात मध्यरात्रीच्या सुमारास कोम्बिंग आॅपरेशनमध्ये त्या सक्रिय होत्या. त्याचप्रमाणे संचालनातदेखील स्वत: सहभागी झाल्याने पोालिसांचे मनोबल वाढण्यास मदत झाली.
विधानसभा निवडणुकीची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने खूप मेहनत घेतली, कुणीही कर्तव्यात कसूर केली नाही त्यामुळे आपण १५ विधानसभा मतदारसंघांत शांततेत निवडणूकप्रक्रि या पार पाडू शकलो, निवडणुकीच्या काळातच अतिवृष्टी, महापूर, पीक नुकसान, व्हीआयपी दौरे, आदी कामेही यंत्रणेला करवी लागली, निवडणूकीची जनजागृती, मतदार यादी शुद्धीकरण मोहीम, कर्मचारी प्रशिक्षण, प्रतिबंधात्मक कारवाई, ईव्हीएम जनजागृती, कर्मचारी बदल्या, लोकप्रतिनिधी, उमेदवारांच्या बैठका, कायदा व सुवस्थेचे नियोजन या सर्व कामकाजात कर्तव्यात कुणीही कसूर केली नाही, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंह, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग यांनी मेहनत घेतली. निवडणूक निर्विघ्न पार पडली. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी
निवडणुकीत कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्वच अधिकाºयांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांना सूक्ष्म नियोजन केले गेले. सराईत गुन्हेगारांना हद्दपार करणे, स्थानबद्ध करणे, शहरात वास्तव्यास मनाई यासह कोम्बिंग आॅपरेशन राबविण्यावर भर दिला गेला. संवेदनशील पोलीस ठाणे हद्दीत सशस्त्र संचलन करण्यात आले. पोलीस प्रशासनाला नाशिककरांचेही वेळोवेळी सहकार्य लाभले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दौरा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रॅली अशा सगळ्या महत्त्वाच्या टप्प्यात नाशिक पोलिसांनी आपापली भूमिका चोखरीत्या बजावली. त्यामुळे शहरात सर्व काही सुरळीत पार पडले अन् त्याचे श्रेय सर्व अधिकारी, कर्मचारी वर्गाला जाते.
- विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त

निवडणूकप्रक्रिया शांततेत सुरळीत पार पाडण्याचे मोठे आव्हानच होते; मात्र मला लाभलेली अधिकारी, कर्मचारी यांची टीम सुदैवाने कठोर परिश्रम करणारी आहे. दोन महिन्यांपासून पूर्वतयारीवर भर दिला. त्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकारी, कर्मचाºयांना दिल्या. सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून ती चोखपणे बजावली. संवेदनशील भाग निश्चित करून मालेगावसारख्या भागात सशस्त्र संचलन दिवस-रात्र राबविले. बंदोबस्तासाठी लागणाºया सुविधा पुरविल्या. ‘टीम स्पिरीट’ विकसित केले. गुन्हेगारांना हद्दपार करत संशयितांवर सातत्याने पथकांकडून वॉच ठेवला जात होता. सांघिक कामगिरी यशस्वी झाल्यामुळे सर्वांचा दीपावलीचा आनंद खºया अर्थाने द्विगुणित झाल्यासारखा वाटतो.
- डॉ. आरती सिंह, पोलीस अधीक्षक

Web Title:  Nightly rabbi governing body; Election smooth due to action plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.