शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाइट कर्फ्यू : पहाटेपर्यंत पोलीस गस्त अन‌् सक्तीची नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:20 IST

रात्री११ वाजेपासून पहाटे सहा वाजेपर्यंत शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ह्यअह्ण पॉइंटवरील ठिकाणांवर बॅरिकेडचा वापर करुन नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच पहाटेपर्यंत चोख पेट्रोलिंग आपआपल्या हद्दीत करत 'नाइट कर्फ्यू'चे उल्लंघन करताना कोणीही आढळून आल्यास संबंधितावर तत्काळ आपत्ती व्यवस्थापन कायदा व कलम-१८८नुसार कारवाचे आदेश देण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंचारबंदीचे उल्लंघन भोवणारसंचारबंदीची अंमलबजावणीचे सक्तीचे आदेशपाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमण्यावरदेखील निर्बंध

नाशिक : कोरोनाचा प्रादूर्भाव अन आगामी ख्रिसमसचा सण व थर्टी फर्स्टच्या निमित्ताने सार्वजनिकरित्या शहर व परिसरात कोठेही नागरिकांची एकत्रित गर्दी जमून आणि कोरोनाचा प्रसार होण्यास निमंत्रण मिळण्याची शक्यता लक्षात घेता शासनाच्या आदेशानुसार पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत रात्री ११ ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी आदेश (कलम-१४४/१/३) लागू केल्याचे जाहीर केले. यानुसार बुधवारी (दि.२३) रात्रीपासून शहरात पोलिसांकडून अंमलबजावणी केली जात आहे. सक्तीची नाकाबंदी आणि पहाटे सहा वाजेपर्यंत चोख पोलीस गस्त सुरु करण्याचे आदेश पाण्डेय यांनी दिले आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव टाळण्यासाठी तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाण्डेय यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३च्या कलम-१४४ (१) व (३) अन्वये रात्री ११ ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी (मनाई आदेश) लागू केली आहे. बुधवारपासून येत्या ५ जानेवारीपर्यंत आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत या आदेशाचे पालन करणे नागरिकांवर बंधनकारक राहणार आहे. याप्रकरणी पोलिसांना अंमलबजावणीचे आदेश देण्यात आल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडावर प्रत्येकाने मास्क लावणे, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित दोन फुटांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. पान, गुटखा, तंबाखूसेवन व मद्यप्राशन, धुम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिकरित्या पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमण्यावरदेखील निर्बंध घालण्यात आले आहे. प्रवास करताना तसेच कामाच्याठिकाणीसुध्दा मास्क लावणे बंधनकारक आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे थुंकण्यावरसुध्दा बंदी घालण्यात आली आहे. रात्री ११ वाजेनंतर चौकांमध्ये तसेच रस्त्यांवर घोळक्याने फिरताना किंवा गप्पा मारताना कोणीही आढळून आल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.संचारबंदीची अंमलबजावणीचे सक्तीचे आदेशरात्री११ वाजेपासून पहाटे सहा वाजेपर्यंत शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ह्यअह्ण पॉइंटवरील ठिकाणांवर बॅरिकेडचा वापर करुन नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच पहाटेपर्यंत चोख पेट्रोलिंग आपआपल्या हद्दीत करत 'नाइट कर्फ्यू'चे उल्लंघन करताना कोणीही आढळून आल्यास संबंधितावर तत्काळ आपत्ती व्यवस्थापन कायदा व कलम-१८८नुसार कारवाइचे आदेश देण्यात आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस