निफाड @ ५.४
By Admin | Updated: January 20, 2016 23:06 IST2016-01-20T23:04:48+5:302016-01-20T23:06:54+5:30
निफाड @ ५.४

निफाड @ ५.४
निफाड : तालुक्यात थंडीचा कडाका वाढला असून, बुधवारी ५.४ अंश सेल्सिअस नीचांकी तपमानाची नोंद झाली. थंडीने निफाड तालुका गारठला आहे.
तालुक्यात पाच दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी झाले होते. मंगळवारी तालुक्यात ७.४ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर रात्रीपासून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. बुधवारी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान केंद्रात ५.४ अंश सेल्सिअस एवढ्या नीचांकी तपमानाची नोंद झाली. संपूर्ण तालुका सकाळी थंडीने गारठल्याने नागरिकांनी दुपारपर्यंत उबदार कपडे घालणे पसंत केले. थंडीपासून बचावासाठी सर्वत्र शेकोट्या पेटवल्या जात आहे.
गहू, कांदा पिकांना ही थंडी पोषक आहे; मात्र द्राक्षबागाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. थंडीमुळे द्राक्ष मण्याना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निफाड तालुक्यात डिसेंबर २०१५ मध्ये कडाक्याच्या थंडीने निफाडकर गारठले होते. २५ डिसेंबरला या तालुक्यात सर्वात कमी ५ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली होती. त्यानंतर २७ दिवसांनंतर २० जानेवारीला ५.४ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली. (वार्ताहर)