निवृत्ती महाराज यांचा समाधी सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 01:19 IST2019-07-03T01:18:12+5:302019-07-03T01:19:11+5:30

त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा समाधी सोहळा उत्साहात साजरा झाला. यानिमित्त माधवदास राठी महाराज यांचे समाधीचे कीर्तन झाले. निवृत्तिनाथांनी ज्येष्ठ वैद्य द्वादशी १२१९ला समाधी घेतली.

Nidhtraj Maharaj's Samadhi Ceremony | निवृत्ती महाराज यांचा समाधी सोहळा उत्साहात

निवृत्ती महाराज यांचा समाधी सोहळा उत्साहात

ठळक मुद्दे निवृत्तिनाथांनी ज्येष्ठ वैद्य द्वादशी १२१९ला समाधी घेतली.

त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा समाधी सोहळा उत्साहात साजरा झाला. यानिमित्त माधवदास राठी महाराज यांचे समाधीचे कीर्तन झाले. निवृत्तिनाथांनी ज्येष्ठ वैद्य द्वादशी १२१९ला समाधी घेतली.
त्र्यंबकेश्वरच्या समाधी मंदिरात मंगळवारी (दि.२) सकाळी विविध पूजापाठ व कीर्तन झाले. त्यानंतर समाधीची महापूजा योगेश महाराज गोसावी यांनी केली. यावेळी उपस्थित भाविकांनी समाधीचे अभंग सादर केले. कार्यक्र मास विश्वस्त मंडळातील सदस्य जिजाबाई लांडे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे, मधुकर लांडे, पवनकुमार भुतडा, मुरलीधर पाटील, शांताराम दुसाने, चिंतामण माळी, रत्नाकर शेलार, जगन्नाथ चौधरी, नितीन गायकवाड आदी उपस्थित होते. दरम्यान, पेगलवाडी फाट्यावरील निवृत्तिनाथ महाराजांच्या चरण पादुकांचे पूजन तुळशीराम गुट्टे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बाळासाहेब शेळके, पुंडलिक फड, शांताराम महाराज दुसाने, नितीन गायकवाड उपस्थित होते.

Web Title: Nidhtraj Maharaj's Samadhi Ceremony