नवीन बाधित आणि कोरोनामुक्त समान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 01:40 IST2021-07-10T01:38:59+5:302021-07-10T01:40:55+5:30

जिल्ह्यात शुक्रवारी नवीन कोरोनाबाधित रुग्णसंख्या १६५ तर कोरोनामुक्त त्यापेक्षा केवळ एकने अधिक १६६ होते. दरम्यान, जिल्ह्यात ७ नागरिकांचा मृत्यु झाला

Newly infected and corona-free alike | नवीन बाधित आणि कोरोनामुक्त समान

नवीन बाधित आणि कोरोनामुक्त समान

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी नवीन कोरोनाबाधित रुग्णसंख्या १६५ तर कोरोनामुक्त त्यापेक्षा केवळ एकने अधिक १६६ होते. दरम्यान, जिल्ह्यात ७ नागरिकांचा मृत्यु झाला असून, त्यात नाशिक ग्रामीणचे ५ तर नाशिक मनपा क्षेत्रातील दोघांचा समावेश असून, एकूण बळींची संख्या ८,४२० वर पोहाेचली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचे प्रमाण ९७.४२ टक्क्यांवर तर उपचारार्थी रुग्णसंख्येत केवळ एकने घट येऊन १७७८ वर आली आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांच्या संख्येत भर पडली असून, ती १३५४ वर पोहोचली आहे. प्रलंबित अहवालांमध्ये सर्वाधिक ८१७ अहवाल नाशिक ग्रामीणचे, नाशिक मनपाचे ३०१ तर मालेगाव मनपाचे २३६ अहवाल प्रलंबित आहेत.

Web Title: Newly infected and corona-free alike