नामपूरला नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 18:39 IST2021-01-27T18:38:37+5:302021-01-27T18:39:14+5:30
नामपूर : ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचीत सदस्याचा श्रीहरी प्रतिष्ठान तर्फे सन्मान चिन्ह, शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात महत्वाची समजल्या जाणाऱ्या नामपूर ग्रामपंचायत निवडणुक नुकतीच पार पडली. मतदारांनी सर्व नवीन तरुण उमेदवारांना कौल देत निवडून दिले. या सर्व नूतन सभासदांनी पुढील पाच वर्ष विकास कामाने गावाचा सर्वागीण विकास करावा या हेतूने येथील श्रीराम मंदिरात सर्व नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

नामपूर येथे श्रीहरी प्रतिष्ठानतर्फे सत्कार कार्यक्रमात उपस्थित नूतन सदस्य.
नामपूर : ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचीत सदस्याचा श्रीहरी प्रतिष्ठान तर्फे सन्मान चिन्ह, शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात महत्वाची समजल्या जाणाऱ्या नामपूर ग्रामपंचायत निवडणुक नुकतीच पार पडली. मतदारांनी सर्व नवीन तरुण उमेदवारांना कौल देत निवडून दिले. या सर्व नूतन सभासदांनी पुढील पाच वर्ष विकास कामाने गावाचा सर्वागीण विकास करावा या हेतूने येथील श्रीराम मंदिरात सर्व नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
येथील ग्रामपंचायत निवडून अत्यंत शांततेत झाली. येथील सदस्यांनी गट तट विसरून कामाला सुरुवात करावी. तसेच गावातील तरुणांनी राजकारणात प्रवेश केल्याने एक नवे पर्व सुरु झाल्याने त्यांना शाबासकी म्हणून श्रीहरी प्रतिष्ठान तर्फे नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य गुलाब कापडणीस तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार दिलीप बोरसे, रयत क्रांती संघटनेचे दीपक पगार, बाजार समितीचे संचालक अविनाश सावंत उपस्थित होते.
यावेळी प्रतिष्ठानचे शरद नेरकर, उन्नती विद्यालयाच्या मुख्याध्यापक स्नेहलता नेरकर, परिवर्तन पॅनलचे विनोद सावंत, सुभाष मुथा, रमेश मुथा, सचिन मुथा, युवराज दाणी, दिनेश वाणी, विठ्ठल मॅगजी, जगदिश सावंत, निलेश सावंत, शरद खैरनार, सतिश कापडणीस, प्रशांत बैरागी, विलास सावंत, राजू सावंत, ग्रामविकास अधिकारी केशव इंगळे, तारीक शेख, राजू पंचाल, चारुदत्त खैरनार, प्रभू सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग पाटील यांनी केले'.
सत्कारमुर्ती
पुष्पा मुथा, विलास सावंत, जयश्री अहिरे, प्रमोद सावंत, रंजना मुथा, केदा पगार, मनीषा पवार, ग्यानदेव पवार, अनिता दळवी, जितेंद्र सूर्यवंशी, प्रिती कोठावदे, शरद पवार, गायत्री सावंत, संजय सोनवणे, शोभा सावंत, कमलाकर सोनवणे, रेखा पवार, किरण सावंत, मंगला पवार, नारायण सावंत.