शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

मेहंदी पुसण्याअगोदर नववधूचा ह्रदयविकाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 3:58 PM

साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे गेल्या दहा दिवसांपूर्वी थाटात आणि आनंदात लग्न झालेल्या सोनवणे परिवारातील नववधू मंगल सोनवणे (१९) हिचा हातावरची मेहंदी पुसण्याअगोदर मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे गेल्या दहा दिवसांपूर्वी थाटात आणि आनंदात लग्न झालेल्या सोनवणे परिवारातील नववधू मंगल सोनवणे (१९) हिचा हातावरची मेहंदी पुसण्याअगोदर मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे सोनवणे परिवारावर दुख:चा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.निसर्गाचा लहरीपणा आणि बेरोजगारीने हैराण झालेल्या ग्रामीण भागातील बळीराजा हतबल झाला असतांना सुशिक्षित बेरोजगार तरु णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्या अनुशंगाने आपल्या मुलाचे लग्न कसे करावे असा गंभीर प्रश्न प्रत्येक बापापुढे संकट म्हणून उभा ठाकला आहे. नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील अवघी दोन एकर कोरडवाहू शेती असणारा शेतकरी गंगाधर दौलत सोनवणे यांना तीन मुले आहेत.पैकी एकाचे लग्न झाले होते. तर दुसºया मुलाचे लग्न करण्याचा प्रश्न होता. म्हणून मालेगाव तालुक्यातील चिखलओहळ येथून पोटाची खळगी भरण्यासाठी गोकुळ नथू खैरनार हे आपल्या कुटुंबासह साकोरा येथे चार वर्षांपूर्वी आलेले होते. त्यांना देखिल पाच मुली असून मोठी मुलगी मंगल आणि सोनवणे परिवारातील सागर यांचा विवाह याच महिन्यात ५ जुलै रोजी थाटात संपन्न झाला. त्यासाठी वरपिता गंगाधर सोनवणे यांनी स्वत:ची दोन एकर जमीन पडीक ठेऊन तसेच लहानपणापासुन सांभाळून ठेवलेली बैलजोडी चारा उपलब्ध नसल्याने चारा छावणीत दाखल केली होती. केवळ लग्नासाठी बैलजोडी पन्नास हजारात विकून, पतसंस्थेचे पन्नास हजार रु पये कर्ज आणि नातेवाईकांकडून उसनवारीचे काही पैसे असे एकुण तीन लाख रूपये स्वत: खर्च करून लग्न सोहळा पार पडला.मात्र त्यानंतर आठच दिवसात नववधू मंगलची अचानक प्रकृती बिघडली आणि खाजगी दवाखान्यात उपचार सुरू केले.मात्र आज सकाळी लग्नानंतर अवघ्या अकराव्या दिवशी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मंगलचा हाताची मेहंदी पुसण्याअगोदर मृत्यू झाल्याने सोनवणे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक