इच्छुकांकडून मतदारांना नवीन वर्षाचे भेटकार्ड वाटप

By Admin | Updated: November 8, 2016 01:45 IST2016-11-08T01:48:41+5:302016-11-08T01:45:29+5:30

महापालिका निवडणूक: महिलांना रोजगार

New year's Gift Card allocation from voters to voters | इच्छुकांकडून मतदारांना नवीन वर्षाचे भेटकार्ड वाटप

इच्छुकांकडून मतदारांना नवीन वर्षाचे भेटकार्ड वाटप

पंचवटी : दिवाळी सण तसेच येणाऱ्या नवीन वर्षानिमित्त आगामी महापालिका निवडणुकीत इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून मतदारसंघात नवीन वर्षानिमित्त भेटकार्ड वाटप केले जात असल्याने महिलांना रोजगार मिळत आहे.
सध्या परिसरातील चौकाचौकातील घराघरात सर्वपक्षीय इच्छुकांचे दिवाळी भेटकार्ड पोहोचविण्याचे काम महिला करत आहे. ठरवून दिलेल्या विभागात महिलांनी कार्ड वाटप केल्यानंतर त्यांना कामाचा मोबदला म्हणून २५० ते ३०० रुपये दिले जात आहे. महापालिका पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजल्याने सध्या पंचवटी प्रभागात निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी ज्या पक्षाकडून निवडणूक लढविणार आहे त्या पक्षाच्या नेते मंडळींचे फोटो, पक्षाचे नाव, चिन्ह व स्वत:चा फोटो दीपावलीचा संदेश टाकून भेटकार्ड तयार केले आहे.  आगामी निवडणुकीत प्रभागरचना असल्याने त्यातच मोठे प्रभाग असल्याने नवीन वर्षांचे भेटकार्ड घरोघरी पोहोचविण्याचे काम इच्छुक महिलावर्गाकडून रोजंदारीवर करून घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)

Web Title: New year's Gift Card allocation from voters to voters