शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
2
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
4
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
5
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
6
USA vs CAN : वर्ल्ड कपचा श्रीगणेशा! कॅनडा विरूद्ध अमेरिका म्हणजे IND vs PAK, जाणून घ्या कारण
7
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
8
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
9
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
10
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
11
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
12
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
13
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
14
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
15
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
16
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
17
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
18
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी
19
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
20
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर

नाशिकमध्ये नववर्ष स्वागताची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:12 AM

उत्सवांची नगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताचीही जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील विविध हॉटेल्स तसेच धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक संघटनांसह तरुणांचे वेगवेगळे ग्रुप नववर्ष स्वागताची जय्यत तयारी करीत आहेत.

नाशिक : उत्सवांची नगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताचीही जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील विविध हॉटेल्स तसेच धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक संघटनांसह तरुणांचे वेगवेगळे ग्रुप नववर्ष स्वागताची जय्यत तयारी करीत आहेत. त्यामुळे नाशिककरांना शहरात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत धार्मिक कार्यक्रमांचीही मेजवानी अनुभवता येणार आहे. नाशिक शहरासह उपनगर नाशिकरोड, सिडको, सातपूर आडगाव परिसरातील चांगल्या सुविधा देणाऱ्या कृषिपर्यटन केंद्र आणि हॉटेल्सला तरुणाईची पसंती मिळत असून, अनेकांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला तर काहींनी नववर्षाच्या पहाटे जल्लोषाची तयारी केली असून, काही तरुणांची रात्रभर जागरण करून नववर्षाचे स्वागत करण्याची तयारी आहे.शहरातील क्लब, हॉटेल व्यावसायिकांनी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी पॅकेजची घोषणा केली आहे. यात सांस्कृतिक कार्यक्रमासह भोजन आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गर्दी वाढण्याची शक्यता आहे. अनेकदा गर्दीला आवरणे हॉटेल मालकांना फारच अवघड जाते. हॉटेलच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मेन्यूत वाढ करून गर्दी कमी करण्याचा काही हॉटेल मालकांचा प्रयत्न दिसून येत आहे. अनेकांनी इमारतीच्या गच्चीवर पार्टीचे आयोजन केले आहे. तसेच सोसायटीच्या आवारातही कौटुंबिक नवे वर्ष सेलिब्रेशनचेही आयोजन करण्यात आले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस विभागही सज्ज झाला आहे.सोसायटी आवारात सेलिब्रेशन करून नववर्षाचे स्वागत करणाºया सोसायट्यांनी ध्वनीक्षेपकाची परवानगी घेणे आवश्यक असल्याने त्यांना कार्यक्रमापूर्वीच संबंधित परवाने मिळवून पोलीस प्रशासनाला कार्यक्रमांची माहिती द्यावी लागणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत अनेकजण मद्यधुंद अवस्थेत करतात, त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे शहरातील वर्दळीच्या भागात तसेच मुख्य रस्त्यांवरही पोलिसांना करडी नजर ठेवण्याचे आव्हान आहे.कोकण, गोवा पर्यटनाचे बेतनाशिकमधील वेगवेगळ्या वाइनरी आणि कृषिपर्यटन केंद्रासह नामांकित हॉटेल्समध्ये नववर्ष स्वागताच्या मेजवान्या रंगत असल्या तरी नाशिककर तरुणाईला शहराबाहेर पडून आनंदोत्सव करण्याची भारी हौस आहे. त्यामुळे अनेकजण कोकण, गोव्यासह केरळच्या सहलींचेही नियोजन करीत आहेत. तर अनेकांनी गडकोटांवर स्वच्छता करून नववर्षाच्या स्वागताची तयारी केली आहे.शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी४नाशिक शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातही नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी दिसून येत आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठिकठिकाणी गाण्यांच्या मैफलींसह गतवर्षातील आठवणींना उजाळा देणारे गप्पाटप्पांचे विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचप्रमाणे विविध सामाजिक व सांस्कतिक संघटनांकडून रामकुंड गोदाघाट परिसरात दीपप्रज्वलन, रांगोळी असे विविध उपक्रम राबवून नवीन वर्षाचे स्वागत करण्याची तयारी सुरू आहे.

टॅग्स :New Year 2019नववर्ष 2019Nashikनाशिक