शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षात शेतकऱ्यांचा सरकारविरोधी एल्गार, सुकाणू समिती 1 जानेवारीच्या बैठकीत ठरविणार राज्यव्यापी आंदोलनाची दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 15:32 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात एल्गार पुकारण्याची तयारी सुरू झाली असून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सूकाणू समितीची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये बैठक बोलाविण्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा सरकारविरोधात एल्गार सूकाणू समितीची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये बैठक राज्यस्तरीय बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार

नाशिक : शेतकरी संपाचे सूकाणू समितीच्या माध्यमातून केंद्र बनलेल्या नाशिक शहरातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारविरोधात एल्गार पुकारण्याची तयारी सुरू झाली असून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सूकाणू समितीची नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये बैठक बोलाविण्यात आली आहे. सूकाणू समितीची ही राज्यस्तरीय बैठक 1 जानेवारी 2018 रोजी अशोका मार्ग परिसरातील बगाई बँक्वेट हॉल येथे होणार आहे.शेतकऱ्यांच्या कजर्मुक्तीसह विविध समस्यांच्या निराकरणासाठी नाशिकमधून सुकाणू समितीच्या माध्यमातून उभा राहिलेल्या लढय़ाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यव्यापी जनजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, सरकारने हिवाळी अधिवेशनात सरकारच्या समस्यांवर कोणत्याच धोरणात्मक विषयावर चर्चा घडवून न आणता शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सुकाणू समितीने केला असून सरकारविरोधात शेतकऱ्यांचा लढा आणखी तीव्र करण्याचा विचार सूकाणू समितीने केला आहे. या शेतकरी आंदोलनाच्या पुढील टप्प्याची सुरुवातही नाशिकमधूनच होणार असल्याने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष नाशिक येथील सूकाणू समितीच्या बैठकीकडे लागले आहे. सूकाणू समितीच्या या बैठकीत पुढील आंदोलनाची रणनिती ठरविण्यासोहचट आंदोलनाचे स्वरूप कशाप्रकारे असावे, याविषयावरही चर्चा आहे. सरकारकडून शेतकऱ्यांची वारंवार उपेक्षा होत असल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा राज्यव्यापी आदोलन करून चक्काजाम करण्याचा शेतकऱ्यांचा विचार आहे. राज्यातील बाजारपेठांसोबतच राज्याबाहेरून महाराष्ट्रात येणारा भाजीपाल्याचा पुरवठाही खंडीत करण्याच्या दृष्टीने आंदोलनाची तयारी करावी असा मतप्रवाह शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे. परंतु, राज्यभरात शेतकऱ्यांनी केलेली आंदोलने व त्यांचा सरकारवर झालेला परिणाम याचा सविस्तर विचार करून 1 जानेवारीच्या राज्यस्तरीय बैठकीत चर्चा होणार असून पुढील आंदोलनाची दिशाही ठरविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनNashikनाशिक