येवल्यात नवीन मतदार नोंदणी अभियान
By Admin | Updated: June 21, 2014 01:03 IST2014-06-20T22:10:34+5:302014-06-21T01:03:41+5:30
येवल्यात नवीन मतदार नोंदणी अभियान

येवल्यात नवीन मतदार नोंदणी अभियान
येवला : लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदार मतदानापासून वंचित राहिल्याने मोठा गदारोळ झाला. या पार्श्वभूमीवर ज्यांची नावे मतदार यादीतून वगळली गेली त्यांच्यासह नवीन मतदार नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या संबंधाने येवला तहसील कार्यालयात २४८ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व विविध शाळांचे मुख्याध्यापक यांच्या सहविचार सभा आयोजित करून कामकाजाची दिशा ठरविली.ज्या मतदारांची नावे यापूर्वी वगळली गेली, त्यांनी फॉर्म नं. ६ भरून पुन्हा मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी दाखला किंवा रेशनकार्डची झेरॉक्सप्रत आवश्यक आहे. तहसीलदार शरद मंडलिक यांनी मतदार नोंदणी मोहिमेचे नियोजन यावेळी उपस्थितांना दिले. १ जानेवारी १४ पर्यंत १८ वर्ष वयाची पूर्ण झाले असेल किंवा वगळलेले नाव पुनर्नोंदणी करायची असेल त्यांनी २१ , २२, २६ व २९ जून या चार दिवसांत संबंधित मतदान बूथवर संपर्क करावयाचा आहे. या विशेष मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक या स्थळांवर उपस्थित राहणार आहेत १०० टक्के मतदार नोंदणी या मोहिमेत अपेक्षित आहे. (वार्ताहर)