चांदवड येथे पुन्हा नवीन दहा कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:08 IST2020-08-11T22:57:00+5:302020-08-12T00:08:24+5:30
चांदवड : तालुक्यात पुन्हा नव्याने दहा कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मंगळवारी (दि. ११) आलेल्या अहवालात दहा व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी पंकज ठाकरे यांनी दिली.

चांदवड येथे पुन्हा नवीन दहा कोरोनाबाधित
चांदवड : तालुक्यात पुन्हा नव्याने दहा कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मंगळवारी (दि. ११) आलेल्या अहवालात दहा व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी पंकज ठाकरे यांनी दिली.
वडाळीभोई- १, रायपूर- १, चांदवड- ४, डोणगाव- १, पिंपळद १, खासगी लॅब, चांदवड दोन रुग्ण ५५ वर्षीय पुरुष व ३१ वर्षीय महिला. नाशिक मनपा येथे स्वॅब दिलेले चार रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. नागरिकांनी काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केले.
तालुक्यातील दरेगाव येथे एक कोरोनाबाधित आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, खेड्या-पाड्यात कोरोनाने प्रवेश केल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी.