शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

नवीन टेक्नॉलॉजीमुळे कॅन्सर रुग्णांना जीवदान : रावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 1:03 AM

देशात कॅन्सर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्याचे स्वरूपही बदलले आहे़ पूर्वी रुग्णास कॅन्सर झाला याचे निदान अखेरच्या टप्प्यात होत होते़ मात्र, वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता रुग्णास कॅन्सर आहे की नाही हे प्रथम टप्प्यातही शक्य होत असून, त्यानुसार उपचार केल्यानंतर तो पूर्णपणे बराही होतो आहे़ कॅन्सरवरील उपचारासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाºया नवीन तंत्रज्ञानामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना जीवदान मिळत असल्याचे प्रतिपादन न्यू दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलचे विभागप्रमुख पद्मश्री डॉ़ सौमित्र रावत यांनी केले़

नाशिक : देशात कॅन्सर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्याचे स्वरूपही बदलले आहे़ पूर्वी रुग्णास कॅन्सर झाला याचे निदान अखेरच्या टप्प्यात होत होते़ मात्र, वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता रुग्णास कॅन्सर आहे की नाही हे प्रथम टप्प्यातही शक्य होत असून, त्यानुसार उपचार केल्यानंतर तो पूर्णपणे बराही होतो आहे़ कॅन्सरवरील उपचारासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाºया नवीन तंत्रज्ञानामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना जीवदान मिळत असल्याचे प्रतिपादन न्यू दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलचे विभागप्रमुख पद्मश्री डॉ़ सौमित्र रावत यांनी केले़   नाशिक सर्जिकल सोसायटी व असोसिएशन आॅफ आॅटोलरिंगोलॉजिस्टस आॅफ इंडिया, नाशिक कान, नाक, घसा तज्ज्ञ संघटना यांच्या सहकार्याने रविवारी (दि़२२) एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये कॅन्सर शस्त्रक्रियाविषयक वैद्यकीय परिषद ‘सिम्पोझिअम - २०१८’चे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी पद्मश्री रावत यांनी जठर व गुद्द्वाराच्या कॅन्सरवरील उपचार व शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली़ त्यांनी सांगितले की, रुग्णास जठराच्या कॅन्सरचे निदान झाल्यानंतर अवघे चार-सहा महिनेच आयुष्य शिल्लक राहत होते तसेच गुदद्वाराच्या कॅन्सरमध्ये ते काढून टाकावे लागत होते़ मात्र, आता शस्त्रक्रियेद्वारे जठराचा कॅन्सर असलेल्या रुग्णाचे आयुष्य वाढले आहे़ तसेच गुदद्वाराचा कॅन्सर हा शस्त्रक्रियेने पूर्णपणे बरा होत असून, त्यासाठी गुदद्वार काढण्याची आवश्यकताही नाही़ देशात कॅन्सरवर सर्व उपचार होत असल्याचे रावत यांनी सांगितले़  या परिषदेमध्ये झालेल्या परिसंवादात डॉ़विनायक श्रीखंडे यांनी कॅन्सरच्या बदलत्या स्वरुपाबाबत माहिती दिली़ टाटा मेमोरीयल हॉस्पीटलचे विभागप्रमुख शैलेश श्रीखंडे यांनी पूर्वी जठराच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया खूप क्लिष्ट होती व रुग्णही घाबरत असे मात्र आता या शस्त्रक्रियेतील धोका कमी झाल्याचे सांगितले़ एचसीजी मानवता कॅन्सर हॉस्पिटलचे कर्करोग शल्यचिकित्स्क डॉ़राज नगरकर यांनी महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरसाठी पूर्वी स्तन काढावा लागत असे, यामुळे महिलांमध्ये सौंदर्य बिघडल्याची मानसिकता होती़ मात्र आता स्तन न काढता महिलेचे सौंदर्य राखून शस्त्रक्रिया करणे शक्य झाल्याने सांगितले़  वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन डॉ़विनायक श्रीखंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले़ यावेळी नाशिक सर्जिकल सोसायटीचे डॉ़ सुरेश मालेगावकर,सदस्य डॉ़ प्रमोद शिंदे, नाशिक इएनटी सोसायटीचे अध्यक्ष डॉ़शिरीष घन उपस्थित होते़  पुणे येथील डॉ़ अमोल बापये,डॉ़चैतन्य बोर्डे, डॉ़आदित्य मानके, डॉ़नीलेश वासेकर, डॉ़दर्शन पाटील यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले़ या परिषदेत राष्ट्रीय पातळीवरील डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़रोबोटिक सर्जरीमुळे दुष्परिणाम कमी झालेच्अहमदाबाद येथील डॉ़ कौस्तुभ पटेल यांनी डोक्याचा व मानेचा कॅन्सरवर शस्त्रक्रियेतील दुष्परिणम रोबोटिक सर्जरीमुळे कमी झाल्याचे सांगितले़ टाटा मेमोरीयल हॉस्पिटलचे प्राध्यापक डॉ़ पंकज चतुर्वेदी यांनी मुखाच्या कर्करोग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून कोटपा कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे सांगितले़ तर पुण्यातील जहांगिर हॉस्पिटलच्या सर्जिकल आॅन्कोलॉजिस्ट डॉ़स्निता सिनुकुमार यांनी महिलांच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया या दुर्बिनीद्वारे केल्या जात असून महिलांचा प्रत्येक कॅन्सर बरा होत असल्याचे सांगितले़

टॅग्स :cancerकर्करोगdoctorडॉक्टर