शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या शहराध्यक्षपदासाठी नवाच चेहेरा शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:56 IST

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शहराध्यक्षपदासाठी अनेकांची नावे चर्चेत असली तरी त्याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही त्यातच आता प्रदेशाध्यक्षच बदलल्याने धक्कातंत्राचा वापर होऊन प्रस्थापितांऐवजी नवेच नाव पुढे येऊ शकेल, असे सांगितले जात आहे.

नाशिक : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शहराध्यक्षपदासाठी अनेकांची नावे चर्चेत असली तरी त्याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही त्यातच आता प्रदेशाध्यक्षच बदलल्याने धक्कातंत्राचा वापर होऊन प्रस्थापितांऐवजी नवेच नाव पुढे येऊ शकेल, असे सांगितले जात आहे. स्थायी समितीच्या सभापतिपदाच्या निवडीच्या वेळी ज्या पद्धतीने उद्धव निमसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली त्याच धर्तीवर नवे नाव अचानक दिले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.भाजपात एक व्यक्ती एक पद अशी पूर्वी पद्धत होती आता तसे नसले तरी जे आमदार आहेत आणि शहराध्यक्षदेखील आहेत अशांकडील शहराध्यक्षपद किंवा जिल्हाध्यक्षपद काढून घेण्यात येणार आहे. नाशिकमध्ये शहराध्यक्ष पद आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे असून, त्यांनादेखील पर्याय शोधला जात आहे. मध्यंतरी माजी शहराध्यक्ष विजय साने, महेश हिरे, सुनील केदार, उत्तमराव उगले यांची नावे चर्चेत होती. मात्र त्यावर निर्णय होऊ शकला नाही. साने यांच्या नावाविषयी बऱ्यापैकी अनुकूलता असली तरी नवा चेहेरा हाच निकष लावण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आहेत. प्रदेशाध्यक्षपद रावसाहेब दानवे असताना अनेकांनी शहराध्यक्षपद मिळवण्यासाठी व्यूहरचना केली होती. त्या आधारे अनेकांची नावे सांगितली जात असताना आता मात्र भाजपाचे अंतर्गत राजकारणदेखील बदलले आहे. विशेषत: भाजपाच्या प्रदेशाध्यपदी चंद्रकांत पाटील यांची निवड झाल्यानंतर परिस्थिती आणखी बदलू लागली आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी गणेश गिते यांचे नाव सुरुवातीपासून चर्चेत होेते आणि पालकमंत्र्यांचीदेखील त्यांच्या नावाला अनुकूलता होती, असे सांगितले गेले. परंतु धक्कातंत्राचा वापर करीत उद्धव निमसे यांचे नाव अंतिम झाले. त्यामुळे आता शहराध्यक्ष पदासाठीदेखील अशाच प्रकारे वेगळे नाव येऊ शकते, असे भाजपाचे सूत्र सांगत आहेत.ठेकेदाराचे नावही चर्चेतरावसाहेब दानवे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर आणखी काही इच्छुकांना घुमारे फुटले आहेत. एक ज्येष्ठ पदाधिकाºयाने तर महापालिकेत ठेकेदारी करणाºया एका ठेकदार कार्यकर्त्याचे नाव पुढे केले आहे. आता अशाच प्रकारे अनेकांनी नव्याने विविध माध्यमांतून लॉबिंग सुरू केले आहे.

टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिक