नवीन बाधित ६५; कोरोनामुक्त ६२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:17 IST2021-08-26T04:17:48+5:302021-08-26T04:17:48+5:30

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. २५) एकूण ६५ नागरिक नव्याने बाधित झाले असून, ६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ...

New disrupted 65; Corona free 62 | नवीन बाधित ६५; कोरोनामुक्त ६२

नवीन बाधित ६५; कोरोनामुक्त ६२

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. २५) एकूण ६५ नागरिक नव्याने बाधित झाले असून, ६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८,५६६ झाली आहे.

जिल्ह्यात बुधवारी पुन्हा नवीन बाधित आणि कोरोनामुक्तचे प्रमाण जवळपास एकाच पातळीवर आले. जिल्ह्यात नव्याने बाधितांपैकी ३९ नाशिक ग्रामीणचे, २२ नाशिक मनपाचे तर ४ जिल्हाबाह्य क्षेत्रातील आहेत. त्यातही कोरोनामुक्त नागरिकांची संख्या तीनने कमी असल्याने एकूण उपचारार्थी संख्या ९३७ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या ६९९ असून, त्यात सर्वाधिक ३७१ नाशिक ग्रामीणचे, १८८ नाशिक मनपाचे तर १४० मालेगाव मनपा क्षेत्रातील अहवालांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त नागरिकांचे प्रमाण सरासरी ९७.६५ टक्क्यांवर पोहोचले आहे.

Web Title: New disrupted 65; Corona free 62