सटाण्यात नेताजी बोस जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:29 IST2021-01-23T18:28:33+5:302021-01-23T18:29:39+5:30
सटाणा : नगर परिषद व महात्मा गांधी वाचनालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.

सटाण्यात नेताजी बोस जयंती साजरी
ठळक मुद्देबाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
सटाणा : नगर परिषद व महात्मा गांधी वाचनालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रतिमा पूजन नगराध्यक्ष सुनील मोरे, गटनेते दिनकर सोनवणे, आरोग्य समितीचे सभापती दिपक पाकळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी हिरामण सोनवणे, भीमराव सोनवणे, जेष्ठ नागरिक केदा खैरनार, विठ्ठल सोनजे, भालचंद्र निकम, बाळू साबळे, ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार, दिपक सोनवणे, संदीप पवार, मोहन सोनवणे, बाळू देव रे, प्रभाकर सोनवणे, बाळू खैरनार, कृष्णा कासार आदींसह नागरिक व कर्मचारी उपस्थित होते.