नेहाला वैद्यकिय क्षेत्रात करायचे करिअर : शंभर पैकी शंभर टक्के
By Admin | Updated: June 13, 2017 22:00 IST2017-06-13T22:00:49+5:302017-06-13T22:00:49+5:30
येथील रचना विद्यालयाची विद्यार्थिनी नेहा नेमाडे हिने दहावीच्या शालांत परिक्षेमध्ये सुमारे शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.

नेहाला वैद्यकिय क्षेत्रात करायचे करिअर : शंभर पैकी शंभर टक्के
नाशिक : येथील रचना विद्यालयाची विद्यार्थिनी नेहा नेमाडे हिने दहावीच्या शालांत परिक्षेमध्ये सुमारे शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. नेहा नेमाडे हिने कुठलाही अभ्यासाचा ताण न घेता केवळ कॉन्सेप्ट क्लिअर करत दररोज तीन ते चार तास अभ्यासाला दिले. शास्त्रशुध्द पध्दतीने अभ्यासामध्ये सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विषयांच्या कॉन्सेप्ट समजून घेतल्या यामुळे घवघवीत यश मिळविता आल्याचे नेहाने सांगितले. नेहाला वैद्यकिय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. नेहा नेमाडे ही विद्यार्थिनी नाशिक जिल्ह्यात टॉपर आहे. गीतगायन, क्रिकेट, चित्रकलेचीदेखील नेहाला आवड आहे. मुख्याद्यापक संगीता टाकळकर, श्रध्दा कुलकर्णी, श्रुती कुलकर्णी आदि शिक्षकांनी नेहाचे अभिनंदन केले आहे.
तसेच रचना विद्यालयाच्या अक्षता पाटील या विद्यार्थिनीने सुध्दा दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत९९.८० टक्के गुण मिळविले आहे. या दोघी जिल्हयातील गुणवंत विद्यार्थिनी ठरल्या आहेत. विशेष म्हणजे दोघी एकाच शाळेतील आहे. अक्षताचे आईवडील शिक्षक असून, त्यांचे चांगलं मार्गदर्शन मिळाल्याचे अक्षताने सांगितले आहे. स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून सनदी अधिकारी म्हणून करिअर करण्याची अक्षताचा मानस आहे. दररोज सहा तास अभ्यासासाठी दिल्याचे अक्षताने सांगितले.