कूलरच्या वापराबाबत निष्काळजीपणा प्रबोधन : सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:14 IST2018-04-27T00:14:45+5:302018-04-27T00:14:45+5:30

नाशिक : उन्हाळ्यात घरोघरी कूलर वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, कुलर हाताळताना होणाºया वीज अपघाताचे प्रमाणदेखील वाढल्याचा निष्कर्ष महावितरणने काढला.

Negligence awakening of cooler usage: appeal to be safe | कूलरच्या वापराबाबत निष्काळजीपणा प्रबोधन : सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन

कूलरच्या वापराबाबत निष्काळजीपणा प्रबोधन : सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन

नाशिक : उन्हाळ्यात घरोघरी कूलर वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, कुलर हाताळताना होणाºया वीज अपघाताचे प्रमाणदेखील वाढल्याचा निष्कर्ष महावितरणने काढला असून, कूलर वापरताना काय काळजी घ्यावी याबाबत महावितरणकडून प्रबोधन केले जात आहे. लोखंडी पत्र्याच्या कूलरमुळे वीजप्रवाह उतरून अपघाताचा धोका सर्वाधिक असल्याचे संबंधित अधिकाºयांनी खासगीत सांगितले. कूलरचा वापर करताना अनेकवेळा कूलरमध्ये विद्युतप्रवाह उतरून अपघात होण्याची शक्यता असते. तेव्हा कूलरचा गारवा अनुभवताना विद्युत सुरक्षेबाबत नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. निष्काळजीपणा, अतिआत्मविश्वास ही वीज अपघाताची मूळ कारणे असून, प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक दक्षता आणि प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करून सुरक्षित राहणे गरजेचे आहे. शून्य वीज अपघात हे महावितरणचे उद्दिष्ट आहे. कूलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करणे अपेक्षित असताना अनेक ग्राहक अशी खबरदारी घेत नाहीत. ओल्या हाताने कधीही कूलरला स्पर्श करू नये. हे फार धोकादायक आहे. कूलरमधून पाण्याची गळती होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच कूलरची तार पाण्यात पडणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

Web Title: Negligence awakening of cooler usage: appeal to be safe