शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

शिरवाडे वणीत कुसुमाग्रजांच्या स्मारकाची उपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 00:53 IST

शिरवाडे वणी : कविकुलगुरू कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणादायी स्मारकाचे काम त्यांची मायभूमी असलेल्या शिरवाडे वणी गावात पूर्णत्वाला जाऊ शकलेले नाही. स्मारकाचे काम रखडल्याने गावकऱ्यांमध्ये उपेक्षेची भावना असून शासनाने स्मारक पूर्णत्वाला न्यावे, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्दे स्मारकाचे काम रखडल्याने गावकऱ्यांमध्ये उपेक्षेची भावना

दिलीप निफाडे

शिरवाडे वणी : कविकुलगुरू कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणादायी स्मारकाचे काम त्यांची मायभूमी असलेल्या शिरवाडे वणी गावात पूर्णत्वाला जाऊ शकलेले नाही. स्मारकाचे काम रखडल्याने गावकऱ्यांमध्ये उपेक्षेची भावना असून शासनाने स्मारक पूर्णत्वाला न्यावे, अशी मागणी होत आहे.                  नाशिकपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेले शिरवाडे वणी हे ४० वर्षांच्या मागील कालखंडात संपूर्ण महाराष्ट्रात चोरांचे शिरवाडे म्हणून प्रसिद्ध होते. मात्र, या गावाची ओळख कुसुमाग्रजांमुळे कुसुमाग्रजांचे शिरवाडे म्हणून बनली आहे. कुसुमाग्रजांचे त्यांच्या मायभूमीत स्मारक व्हावे यासाठी अशोक निफाडे यांनी स्मारकाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि शिरवाडे वणी ग्रामपंचायतीमार्फत नोव्हेंबर २००४ मध्ये पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.              सातत्याने तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत साडेबारा लाख रुपयांचा निधी कसाबसा पदरात पडला आणि त्या निधीतून सन २००७ मध्ये राष्ट्रीय महामार्गालगत स्वागत कमान व गावालगत स्मारक परिसराला संरक्षक भिंत तसेच पाण्याची टाकी, स्मारक परिसरात काँक्रिटीकरण आदी कामे करण्यात आली.                 राज्यसभेतील खा. बाळ आपटे यांच्या निधीतूनही १० लाख रुपये निधी उपलब्ध करून कुसुमाग्रज वाचनालयाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र, स्मारक परिसरातील स्वच्छतागृह, सांस्कृतिक सभागृह व अन्य कामे रखडलेली आहेत. त्यामुळे स्मारकाच्या उर्वरित कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.केवळ आश्वासनांचा पाऊसपहिल्या टप्प्यातील कामे सुरू झाल्यानंतर गावात लोकप्रतिनिधींची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू झाली होती. निधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक, राजकीय पातळीवरील पुढारी व नेत्यांची अहमहमिका लागली होती. परंतु, स्मारक परिसरात विविध कार्यक्रमांच्या वेळी फक्त आश्वासनांचा पाऊस पडला. आता नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील नवनिर्वाचित सदस्यांनी सदर काम पूर्णत्वास न्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.लोकहितवादी मंडळाकडे लक्षनाशिक येथे कुसुमाग्रजांनीच स्थापन केलेल्या लोकहितवादी मंडळाच्या वतीने ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविले जाणार आहे. या संमेलनासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी संकलित होणार आहे. शासनानेही ५० लाख रुपये अनुदान दिले आहे. लोकहितवादी मंडळाने कुसुमाग्रजांच्या स्मारकासाठी संमेलनाच्या माध्यमातून काही प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा व स्मारक पूर्णत्वासाठी प्रयत्न करावे, अशी मागणीही पुढे येत आहे.फोटो- २९ शिरवाडे वणी

टॅग्स :Kusumagrajकुसुमाग्रजnifadनिफाड