रोजगार क्षमतेसाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज : नीलेश सागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:02 IST2019-07-22T01:01:51+5:302019-07-22T01:02:08+5:30
आजचे शिक्षण आणि उद्योगांना आवश्यक कौशल्ये यामध्ये मोठी तफावत आहे. यासाठी आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करून रोजगारक्षम व्हावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी केले आहे.

रोजगार क्षमतेसाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज : नीलेश सागर
नाशिक : आजचे शिक्षण आणि उद्योगांना आवश्यक कौशल्ये यामध्ये मोठी तफावत आहे. यासाठी आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करून रोजगारक्षम व्हावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी केले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे परशुराम सायखेडकर नाट्यगृहात कौशल्य मार्गदर्शन व सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे संचालक सुनील सैंदाणे, भूषण पटवर्धन, हेमंत राख, सुनील कोरडे, संजय मुलकीकर, कमलेश चिचे, पल्लवी वक्ते, संपत चाटे आदी उपस्थित होते. यावेळी तीन उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हास्तरीय योजना २०१८-१९च्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमातील उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप केले. तसेच प्रशिक्षणानंतर नोकरी प्राप्त झालेल्या उमेदवारांना नियुक्तिपत्रे वितरीत करण्यात आली. या उमेदवारांना प्रशिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांचाही यावेळी गौरव करण्यात आला. सहायक संचालक संपत चाटे यांनी प्रस्ताविक केले. संदीप गायकवाड यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.