शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

पुस्तक चळवळ उभारण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 1:21 AM

मुलांना ऐकू व बोलू देणाऱ्या बाल शाळा असेल तर बालकांचा विकास झपाट्याने होतो. त्यासोबतच लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यामध्ये पुस्तकांची गोडीही निर्माण होण्याची गरज असते.

नाशिक : मुलांना ऐकू व बोलू देणाऱ्या बाल शाळा असेल तर बालकांचा विकास झपाट्याने होतो. त्यासोबतच लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यामध्ये पुस्तकांची गोडीही निर्माण होण्याची गरज असते. त्यासाठी जिथे मुले तिथे पुस्तक अशी चळवळ उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ सुचिता पडळकर यांनी केले. यावेळी त्यांनी कोल्हापूर येथील त्यांच्या फुलोरा शाळेत मुलांना विविध अनुभव देऊन प्रयोगशील शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याची प्रक्रियाही उलगडून सांगितली.नाशिकमधील इस्पॅलियर हेरिटेज स्कूल येथे महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेतर्फे शुक्रवारी (दि.१) बालशिक्षण परिषद व २६ व्या वार्षिक अधिवेशनाची सुरुवात झाली. ‘बाल विकासासाठी आम्ही’ विषयावर होणाºया परिषदेत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.तत्पूर्वी सुचिता पडळकर यांच्या हस्ते अंबर चरख्यावर सूत कातून परिषदेचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या अध्यक्ष अलकाताई बियाणी, संस्थापक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे, दिनेश नेते, डॉ. बाळकृष्ण बोकील उपस्थित होते.प्रास्ताविक सचिन जोशी यांनी केले. महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेच्या सचिव मेघना भाकरे यांनी अहवाल वाचन केले. सूत्रसंचालन स्वाती गद्रे यांनी केले. परिषदेच्या नाशिक केंद्राचे अध्यक्ष शांताराम बडगुजर यांनी उपस्थितांचे आभार मानले.दरम्यान, परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बाळकृष्ण बोकील यांचे ज्ञानांकुर हे आॅडिओ बुक, सुषमा पाध्ये यांचे भाषेच्या कविता व केदार नाईक यांचे कलेचे विश्व या तीन पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :literatureसाहित्यlibraryवाचनालयNashikनाशिक